बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘हे’ लक्षण आढळलं की कोरोना चाचणी पॉझिटिव्ह येते- उदयनराजे भोसले

सातारा | आपल्या हटके आणि बिंधास्त शैलीसाठी खासदार उदयनराजे भोसले सर्वत्र परिचीत आहेत. तसेच उदयनराजे आपल्या रोखठोक वक्तव्यांसाठी राज्यभर चर्चेत असतात. अशातच खोकला आला तरी कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह येते, असं वक्तव्य खासदार उदयनराजेंनी केलं आहे.

खोकला आल्यानंतर कोरोनाची टेस्ट केली असता, कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह येते, अशी माहिती खासदार उदयनराजे यांनी साताऱ्यात माध्यमांशी संवाद साधताना दिली आहे. तसेच, आपल्याला कोरोना झाला होता का नाही माहित नाही. पण, मला ताप आला असताना सुद्धा गार पाणी प्यायचो. त्यामुळंच माझा खोकला वाढला होता आणि माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली, असं उदयनराजेंनी म्हटलं आहे.

पुढं बोलताना उदयनराजे म्हणतात की, कोणीही काळजी करू नका. मला कोरोना झाला होता, तेव्हा कित्येक लोकांनी देव पाण्यात ठेवले होते, हे मला माहित नाही. मात्र, आज मी तुमच्या सर्वासमोर उभा आहे, असंही उदयनराजे म्हणाले.

दरम्यान, मागील महिन्यात उदयनराजे यांच्या आई कल्पनाराजे भोसले यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर उदयनराजे दिल्लीतील पावसाळी अधिवेशन सोडून साताऱ्यात आले होते. त्यानंतर उदयनराजेंची कोरोना टेस्ट केली असता त्यांची टेस्ट पॉझिटिव्ह आली होती.

थोडक्यात बातम्या –

किरीट सोमय्यांनी दंड थोपटले! सोमय्या पुन्हा कोल्हापूर दौऱ्यावर

उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत तालिबानचा मुद्दा; योगी आदित्यनाथ म्हणाले…

“राजू शेट्टी फितूर झाले, साखर कारखानदारांसोबत त्यांनी सेटलमेंट केली”

”माझी पत्नी अंघोळच करत नाही, मला घटस्फोट हवा”

“राकेश टिकैत दरोडेखोर, आंदोलनासाठी त्यांना परदेशातून पैसा मिळतो”

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More