बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ज्यांनी आपल्याला संपवण्याचा प्रयत्न केला त्यांना… – नाना पटोले

ठाणे | महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासुन सर्वच राजकीय पक्ष एकमेकांवर टीका करत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. तसेच येत्या काळात आता महापालिका निवडणुका तोंडावर असताना प्रत्येक राजकीय पक्ष आपल्या पक्षाची मोट बांधण्यासाठी विशेष प्रयत्न करत असल्याचं दिसून येतंय.

अशातच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ठाण्यातील एका कार्यक्रमात बोलत असताना ज्यांनी आपल्याला संपवण्याचा प्रयत्न केला, त्यांना महापालिका निवडणुकीत दाखवुन देऊ, असं म्हटलं आहे. नाना पटोलेंच्या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तसेच यावेळी त्यांनी केंद्र सरकारवरही सडकुन टीका केली.

दरम्यान, नाना पटोले यांनी केंद्रावर निशाणा साधत जीएसटीच्या मुद्यावरून सरकारला खडेबोल सुनावले आहेत. जीएसटीमुळे काहीच फायदा झाला नसून त्यामुळे फक्त मोठ्या उद्योजकांचे खिशे भरले आहेत, अशी टीका नाना पटोलेंनी केंद्रातील मोदी सरकारवर केली आहे.

भाजप सरकार फक्त जनतेचे खिसे कापण्याचं काम करत असून 15 लाख रूपयेही जनतेच्या खात्यात आले नसल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. ठाणे काँग्रेसचे उपाध्यक्ष विनर बिंद्रा यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात नाना पटोले उपस्थित होते, त्यावेळी त्यांनी विरोधकांवर हल्ला चढवला.

थोडक्यात बातम्या

“नारायण राणेंची ओळख शिवसैनिक म्हणुनच; शिवसैनिक कधीच माजी होत नाही”

दादर रेल्वे स्थानकावर अचानक तरूणाने मारली महिलेला मिठी अन् पुढे घडला ‘हा’ प्रकार

सावधान! देशात कोरोनाचं संकट पुन्हा घोंगावतंय; वाचा चिंताजनक आकडेवारी

“मराठवाड्यात दररोज 1 लाख जणांना कोरोनाची बाधा होईल”

श्रद्धा कपूरची ‘ती’ खास चॅट होतेय सोशल मीडियावर व्हायरल, पाहा फोटो!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More