बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महात्मा गांधी स्टाईल! पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १३० कोटी जनतेला केलंय हे महत्त्वाचं आवाहन

नवी दिल्ली | देशातील प्रत्येक नागरिकाने लोकल वस्तू म्हणजे स्थानिक उत्पादनं खरेदी करावीत. आपल्याला लोकलसाठी व्होकल बनायचं आहे. लोकल वस्तूंचा वापर करायचा आहे. याशिवाय लोकल वस्तू आणि उत्पादनाप्रती अभिमानही बाळगायचा आहे, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. म्हणजेच मोदींनी एकप्रकारे स्वदेशीचा नारा दिला आहे.

कोरोनाविरुद्ध लढा देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीयांना आत्मनिर्भर बनायला सांगितलं आहे. त्यासाठी त्यांनी २० लाख कोटी रुपयांच्या विशेष आर्थिक पॅकेजची देखील घोषणा केली आहे. त्यांनी यावेळी जनतेला महत्त्वाच्या सूचना केल्या.

आज ज्याला तुम्ही ग्लोबल ब्रॅण्ड म्हणता ते एकेकाळी लोकल ब्रॅण्ड होते. मात्र तिथल्या स्थानिक लोकांनी त्या वस्तूंचा वापर सुरु केला. त्यांनी त्या वस्तूंचा प्रचार आणि प्रसार केला. याशिवाय त्या वस्तूंप्रती अभिमान बाळगला त्यामुळे आज या वस्तू ग्लोबल बनल्या आहेत. त्यामुळे दररोज प्रत्येक नागरिकाने आपल्या लोकलसाठी व्होकल बनायचं आहे. लोकल वस्तू खरेदी करुन त्याचा प्रचार करा. मला पूर्ण विश्वास आहे आपला देश असं करेल, असं मोदी म्हणाले.

कोरोना संकंटादरम्यान आपल्याला स्थानिक उत्पादन, स्थानिक मार्केट, स्थानिक पुरवठा साखळीचं महत्त्व समजलं आहे. संकटकाळात स्थानिक उत्पादनांनीच आपल्या मागणीच पूर्तता केली आहे. आपल्याला या लोकलनेच वाचवलं आहे. लोकल फक्त गरजच नाही तर आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. लोकलला आपला जीवनमंत्र बनवावंच लागेल, हे आता वेळेने आपल्याला शिकवलं आहे”, असं मोदी म्हणाले.

ट्रेंडिंग बातम्या-

लाॅकडाऊन 4ची घोषणा कधी होणार?, नरेंद्र मोदींनी दिली महत्त्वाची माहिती

कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली ‘ही’ मोठी घोषणा

महत्वाच्या बातम्या-

याला म्हणतात अभ्यास… मोदींच्या आकड्यासोबत पृथ्वीबाबांचा आकडा बरोबर जुळला

राज्यात आज कोरोनाचे किती रुग्ण वाढले?; जाणून घ्या सर्व आकडेवारी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील सर्व महत्त्वाचे मुद्दे एकाच ठिकाणी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More