देश

आम्हाला कोणताही ईगो नाही, चर्चेसाठी नवी तारीख सांगा- नरेंद्रसिंह तोमर

नवी दिल्ली | केंद्र सरकारने पुन्हा एकदा आंदोलक शेतकऱ्यांना चर्चेची नवी तारीख देण्यास सांगितलं आहे. आम्हाला ईगो नाही. आम्ही चर्चेला तयार आहोत, असं केंद्र सरकारकडून सांगण्यात आलं आहे.

शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जोखडातून मुक्त करण्याची आमची इच्छा आहे. शेतकऱ्यांच्या मालाच्या खरेदी-विक्रीवर टॅक्स लागू नये त्यासाठी आमचा प्रयत्न आहे, असं केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी सांगितलं.

केंद्राचे तिन्ही कायदे रद्द करावेत अशी शेतकऱ्यांची मागणी होती. पण कायद्यातील ज्या तरतुदींवर शेतकऱ्यांच आक्षेप आहेत त्यावर मनमोकळी चर्चा व्हावी यासाठी आम्ही तयार आहोत. सरकारला कोणताही अंहकार नाही, असं नरेंद्रसिंह तोमर यांनी म्हटलं आहे.

शेतकरी संघटनांनी चर्चेची तारीख सांगावी, आम्ही त्यांचं संपूर्ण समाधान होईपर्यंत चर्चा करण्यास तयार आहोत, असंही नरेंद्रसिंह तोमर म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

‘…तर आम्हीसुद्धा त्या ठिकाणी शांत राहणार नाही’; रोहित पवारांचा दानवेंना इशारा

“मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन भाजप प्रदेशाध्यक्षांनी राज्य सरकारवर टीका करणे दुर्दैवी”

“भाजपला बुडवण्यास रावसाहेब दानवे आणि देवेंद्र फडणवीस हे दोघे जबाबदार

“नवे संसद भवन हा अतिशय प्रभावी प्रकल्प”

शरद पवारांकडे UPA च्या अध्यक्षपदाची जबाबदारी?

     

    मेलवर बातम्या मिळवा

    खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

    ताज्या बातम्या