बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

चैत्यभूमीवर समीर वानखेडेंच्याविरोधात घोषणबाजी, नवाब मलिक म्हणाले..

मुंबई |  एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर हजेरी लावली. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला अभिवादन करून बाहेर जात असताना त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

समीर वानखेडे मागील काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. वानखेडे चैत्यभूमीवरून बाहेर पडताच त्यांच्या विरोधकांनी घोषणाबाजी करायला सुरूवात केली. यानंतर वानखेडेंच्या समर्थकांनी त्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजीला सुरूवात केली त्यामुळे काही वेळ तेथील वातावरणात गरमा गरमी पाहायला मिळाली.

वानखेडेंनंतर अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनीही चैत्यभूमीवर हजेरी लावली. यावेळी मलिकांनी या घोषणाबाजीवर प्रतिक्रिया दिली. डॉ बाबासाहेबांना अभिवादन करणे हा प्रत्येकाचा अधिकार असून, अभिवादन करणारे एखादे धर्माचे, समाजाचे असं म्हणणं चुकीचं असल्याचं नवाब मलिक म्हणाले आहेत.

दरम्यान, आम्ही इथे दरवर्षी येत असल्याचं मलिक म्हणाले. तर काही लोकांनी येथे येणं सुरू केलं आहे, ही चांगली बाब आहे, असा अप्रत्यक्ष टोला देखील नवाब मलिक (Nawab Malik) यांनी समीर वानखेडेंना लगावला आहे.

थोडक्यात बातम्या-

“कधी कुणाला दहशतवादी समजून गोळ्या घातल्या जातात तर कधी देशद्रोही ठरवून जेलमध्ये टाकले जातं, आता फक्त…”

सारा अली खानने दिला आईसोबत काम करण्यास नकार; कारण वाचून थक्क व्हाल

टीम इंडियाकडून न्यूझीलंडचा वचपा, 372 धावांनी न्यूझीलंडचा दणदणीत पराभव

महाराष्ट्रात लाॅकडाऊन लागणार?; अजित पवार म्हणतात…

अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसला ईडीचा जोरदार झटका; केली लूकआउट नोटीस जारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More