बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुण्यात लॉकडाऊन लागणार का?; वाचा अजित पवारांच्या पत्रकार परिषदेतील सर्व मुद्दे

पुणे | पुणे, पिंपरी चिंचवड तसेच जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या आकडेवारीत मोठी वाढ होत आहे. यादृष्टीने पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी याबाबतचा आढावा घेऊन पत्रकार परिषद घेतली. यावेळी अजित पवार काय म्हणाले, वाचा सर्व मुद्दे-

अजित पवार काय म्हणाले?-

परिस्थिती गंभीर बनत चालली आहे

परिस्थिती अशीच राहिली तर १-२ एप्रिलपर्यंत आम्हाला कठोर निर्णय घ्यावा लागेल

नागरिकांना विनंती आहे की जे नियम ठरवून दिलेत त्यांचं पालन करा

पहिल्यांदा जेव्हा कोरोनाची लाट आली होती तेव्हा जनतेच्या मनात जी भीती होती ती आता राहिलेली नाही

खासगी रुग्णालयांमधील ५० टक्के बेड घेण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे

लसीकरणाची केंद्र दुप्पट करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय

लसीकरणाचा वेग ३०० केंद्रांवरुन ६०० केंद्रांवर नेण्याचा प्रयत्न

लस कमी पडायला नको यासंदर्भात केंद्रीय मंत्र्यांशी बोलणी केली आहे

मंत्री प्रकाश जावडेकर यांनी यासंदर्भात केंद्रातून मदत करण्याचं आश्वासन दिलंय

जास्तीत जास्त नागरिकांना लसीकरण देऊन आजारापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न

१ तारखेपासून सर्वच राजकीय पक्षांनी ठेवलेले कार्यक्रम रद्द केले पाहिजे

लग्नांमध्ये ५० पेक्षा जास्त संख्या ठेवायची नाही

अंत्यविधीचे कार्यक्रम २० लोकांमध्ये उरका

कोरोनाचं संकट दूर होईपर्यंत

गेल्या लाटेत निघत होती त्यापेक्षा जास्त संख्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची जिल्ह्यात निघतेय

पुण्यातील संचारबंदीचा निर्णय जसा होता तसाच राहणार

जर पुणेकरांनी काळजी घेतली नाही तर १ तारखेपासून कठोर निर्णय घ्यावा लागेल

३० एप्रिलपर्यंत शाळा महाविद्यालयं बंद राहणार

सार्वजनिक उद्याने, बाग-बगिचे फक्त सकाळीच चालू राहणार

मॉल मार्केट चित्रपटगृहे फक्त ५० टक्के क्षमतेने चालू राहतील

चाकणमध्ये ऑक्सिजनचा प्लांट तयार झाल्याने अडचण येणार नाही

रायगडमधील JSW या ऑक्सिजनच्या प्लांटशी देखील बोलणी करुन ठेवलेली आहे

एमपीएससीच्या परीक्षा ठरल्याप्रमाणे होईल

दहावी-बारावीच्या परीक्षा देखील ठरल्याप्रमाणे होतील, नियमांचं पालन करावं लागेल

 

महत्त्वाच्या बातम्या-

युपीएच्या नेतृत्वाबाबत संजय राऊत यांचा नवा गौप्यस्फोट, म्हणाले…

सरकारने जबरदस्तीने घरी बसवलं म्हणत IPS अधिकाऱ्याने केलं असं काही की…

“प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी एक कोटी रूपये, हेलीकाॅप्टर देणार आणि चंद्रावरही नेणार”

“भारतात 30 टक्के मुस्लीम एकत्र आले तर चार पाकिस्तान तयार होतील”

” भाजपमध्ये दलितांना किंमत नाही, राष्ट्रपतींनी नमस्कार केला तर मोदी त्यांची दखल घेत नाही”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More