बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

जवानांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही, चीनला जशास तसं उत्तर देण्यास भारत सक्षम- नरेंद्र मोदी

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चिनी सैनिकांसोबत झालेल्या भारतीय सैनिकांच्या चकमकीचा उल्लेख करत भारतीय जवानांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही असं म्हटलं आहे.

देशातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींची मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक होत आहे. त्यापूर्वी मोदींनी गलवान खोऱ्यातील संघर्षावर भाष्य करुन, शहिदांना आदरांजली वाहिली.

नरेंद्र मोदी यांनी चीनला रोखठोक इशारा देत, भारत जशास तसं उत्तर देण्यासाठी सक्षम असल्याचं ठणकावून सांगितलं. भारताचे वीर जवान लढता लढता शहीद झाले आहेत, त्यांचा आम्हाला अभिमान तर आहेच, पण हे बलिदान व्यर्थ जाणार नाही, असं मोदी म्हणाले आहेत.

देशाला विश्वास देऊ इच्छितो की, आपल्या जवानांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही. आमच्यासाठी भारताची अखंडता आणि सार्वभौमत्व सर्वोच्च आहे. त्याच्या रक्षणासाठी आम्हाला कुणीही थांबवू शकत नाही, असं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी ‘या’ चार जणांविरोधात पोलिसात तक्रार दाखल

भाजप नेते हरिभाऊ जावळेंच्या निधनाबद्दल एकनाथ खडसेंचा धक्कादायक गौप्यस्फोट

महत्वाच्या बातम्या-

“एकुलत्या एक पुत्राने देशासाठी प्राणार्पण केल्याचा आम्हाला अभिमान”

“सीमेवर जे घडलं, त्यासाठी नेहरू, इंदिरा गांधींना किंवा राहुल गांधींना जबाबदार धरू शकत नाही”

“झोपाळ्यावर बसून झालं, आता चीनला लाल आँखे दाखवा”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More