मुंबई | जगातील सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अॅपप्लिकेशन असलेलं व्हाॅट्सअॅप नागरिकांसाठी नवनवीन फिचर्स देत असतं. त्यामुळे गेल्या काही वर्षात भारतातच नव्हे तर जगभरात व्हाॅट्सअॅप लोकप्रिय ठरलं आहे. अनेकजण खासगी गोष्टींसाठी, ऑफिसच्या कामासाठी तर काहीजण व्यवसायासाठी व्हाॅट्स अॅपचा वापर करतात. व्हाॅट्सअॅप आल्यापासून चॅटिंगच्या माध्यमातून बोलण्याचं प्रमाण वाढलं आहे. त्यातच आता व्हाॅट्सअॅपचं नवं फिचर बाजारात येणार आहे.
सध्याच्या काळात व्हाॅट्सअॅपमध्ये इमोजी खूप वापरले जात आहेत. त्यामुळे आता व्हाॅट्सअॅपने वेळोवेळी नवनवीन इमोजी युझरच्या वापरात आणले. त्यातच आता इमोजी चाहत्यांसाठी एक नवं फिचर व्हाॅट्सअॅप लवकरच लाँच करण्याची शक्यता आहे. व्हाॅट्सअॅपने लेटेस्ट इमोजी पॅकचा समावेश करण्यास सुरूवात केली आहे. अॅड्राईड फोनच्या बिटा बिल्डमध्ये या नव्या इमोजींचा समावेश करण्यात येत आहे. त्यामुळे आता युझरची उत्सुकता शिगेला पोहचल्याचं दिसतंय.
नव्या इमोजी पॅकमध्ये फायर हार्ट, दाढी असलेले चेहरे त्यासोबतच अनेक किंसिंग असलेल्या चेहऱ्याच्या इमोजींचा समावेश करण्यात आला आहे. अॅड्राईडसोबतच अॅपलच्या देखील इमोजी पॅकमध्ये या फिचरचा समावेश असेल. येणारे होणारे इमोजी पॅक वैशिष्टपुर्ण असल्यानं चाहत्यामध्ये या इमोजी पॅकची उत्सुकता लागली आहे.
दरम्यान, जे युझर्स बिटा बिल्ड असलेला फोन वापरतात त्यांना लवकरच हे इमोजी वापरता येणार आहेत. ज्यांचा बिटा बिल्ड नसेल त्यांच्या फोनवर मॅसेज पाठवल्यास तो त्यांना दिसू शकणार नाही. येत्या काळात अॅड्राईडच्या इतर बिल्डला देखील हे फिचर्स लवकरच उपलब्ध होणार असल्याचे संकेत मिळात आहेत.
थोडक्यात बातम्या-
पीओपी गणेश मुर्तींवर कडक बंदी, चुक कराल तर भराल 10 हजारांचा दंड
मंदिरं उघडण्याचा निर्णय नाहीच?; टास्क फोर्सच्या बैठकीनंतरही कोणती घोषणा नाही!
कोरोनानंतर आता डेंग्यूचा शिरकाव; ‘या’ ठिकाणी वाढतंय संक्रमण
पुण्याला झिका व्हायरसचा धोका?, पुण्यातील ‘इतक्या’ गावांना संभाव्य धोक्याचा इशारा
आनंदाची बातमी! महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत लक्षणीय घट, पाहा आकडेवारी
Comments are closed.