Top News विधानसभा निवडणूक 2019

त्यातले एकपण आमदार होणार नाहीत- शरद पवार

Loading...

परभणी : ज्या आमदार, नेत्यांनी पक्ष सोडला त्यातील एकही यापुढील निवडणुकीमध्ये निवडणून येणार नाही.  आमदार होणार नाही. भाजपकडे संपत्तीचा डोंगर असेल तर आमच्याकडे तरुणांचा सागर आहे. या सागराच्या जोरात आम्ही पुन्हा सत्ता स्थापन करु, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.

राज्य विधानसभा निवडणुसाठी सज्ज झाले आहे. देशातील परिस्थिती समजून घ्यावी यासाठी महाराष्ट्रात फिरत आहे. राज्यात अराजकता माजली आहे. राज्यात शेतकरी, उद्योजक, व्यापारी कोणीही सुखी नाही. त्यासाठी एकसंघ होऊन सत्ता परिवर्तन करावे लागेल, असं आवाहन शरद पवारांनी दिलं.

Loading...

ज्यांना पक्षानं मोठं केलं तेच नेते पक्ष सोडून गेले. मात्र आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांना जनताच धडा शिकवेल, असं शरद पवारांनी म्हटलं आहे. शरद पवार हे सध्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. यादरम्यान हिंगोली येथे बोलताना पवारांनी पक्ष सोडून जाणाऱ्यांवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.

गेल्या पंधरा वर्षात पक्षाने ज्यांना मोठं केलं ते पक्ष सोडून गेले. विकासकामांचं कारण सांगून पक्षांतर करणाऱ्या या नेत्यांनी मंत्री असताना काय काम केलं?, असा सवाल शरद पवारांनी केला आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या- 

Loading...

Loading...
Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या