Barc TRP Report Week 52 l BARC ने जाहीर केला TRP रिपोर्ट; या 5 सिरीयलने मिळवले अव्वल स्थान

Barc TRP Report Week 52

Barc TRP Report Week 52 l BARC ने 2023 च्या शेवटच्या आठवड्यातील TRP अहवाल जारी केला आहे. 52 व्या आठवड्याच्या अहवालात प्रचंड बदल झाला आहे. या यादीत एक नवीन शो दाखल झाला आहे, तर अनुपमाची जादू पुन्हा एकदा पाहायला मिळाली आहे. तसेच ये रिश्ता क्या कहलाता है, इमली आणि इतर शो ने देखील टीआरपी मध्ये बाजी मारली आहे. तर आज आपण Barc ने जारी केलेला TRP चा रिपोर्ट जाणून घेऊयात…

Barc TRP Report Week 52 l अनुपमा :

BARC ने 2023 च्या शेवटच्या आठवड्यात TRP अहवाल जारी केला आहे. यामध्ये अनेक आश्चर्यकारक बदल झाले आहेत. ब-याच दिवसांनंतर अनुपमा या सिरीयलने 52 व्या आठवड्याच्या टीआरपीमध्ये तिची जादू दाखवली आहे.

या शोला 2.6 टीआरपी रेट मिळाला आहे. त्यामुळे अनुपमा मालिकेने TRP यादीत अव्वल स्थान मिळवले आहे.

Barc TRP Report Week 52 l ‘गुम है किसी के प्यार में :

गुम है किसी के प्यार में या मालिकेने प्रदीर्घ काळानंतर दुसऱ्या क्रमांकावर स्थान मिळवले आहे. शक्ती अरोरा आणि भाविका शर्मा स्टारर सीरियलला 2.4 रेटिंग मिळाले आहे. शक्ती अरोरा, भाविका शर्मा आणि सुमित सिंग स्टारर आहेत. गुम है किसी के प्यार में या मालिकेमध्ये नवीन ट्विस्ट आल्यामुळे तो प्रेक्षकांना चांगलाच आवडला आहे. त्यामुळे ही मालिका दुसऱ्या स्थानावर आहे.

Barc TRP Report Week 52 l ये रिश्ता क्या कहलाता है :

समृद्धी शुक्ला आणि शहजादा धामी यांच्या ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेने या आठवड्यात तिसरे स्थान मिळाले आहे. या आठवड्यात या मालिकेचे रेटिंग 2.4 मिळाले आहे. या मालिकेमध्ये नवनवीन ट्विस्ट येत असल्याने रसिक त्याला प्रचंड चांगला प्रतिसाद देत आहेत.

Barc TRP Report Week 52 l इमली :

BARC ने 2023 च्या शेवटच्या आठवड्यात सादर केलेल्या TRP अहवालात इमली या मालिकेने 2.1 रेटिंग मिळवले आहेत. BARC ने याआधी जाहीर केलेल्या TRP अहवालात देखील इमली ही मालिका चौथ्याच स्थानी होती. त्यामुळे या टीआरपीमध्ये कोणताही बदल झालेला नाही.

Barc TRP Report Week 52 l पांड्या स्टोअर :

स्टार प्लसवर असलेली मालिका पांड्या स्टोअरने या आठवड्यात पहिल्या पाचमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. हा शो 2 रेटिंगसह पाचव्या क्रमांकावर आहे. तसेच ही मालिका काही कारणास्तव बंद होणार होती मात्र आता ही मालिका बंद होणार नाहीये.

महत्त्वाच्या बातम्या-

Girish Mahajan | मंत्री गिरीश महाजनांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ!

Online Payment l ऑनलाइन पेमेंट संदर्भात मोठी बातमी!; 10 जानेवारीपासून होणार नवे नियम लागू

Christian Oliver | धक्कादायक बातमी! बड्या अभिनेत्याचा दोन चिमुकल्या मुलींसह विमान अपघातात मृत्यू

Sukanya Samriddhi Yojana l लेकीच्या भविष्याची चिंता विसरा; केंद्र सरकारची ही योजना ठरेल फायद्याची

Stadium मध्ये अंडरवेअरचा खजिना अन् घाणीचे साम्राज्य; BCCI कारवाई करणार?