बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सुधरा रे!! पाकिस्तानच्या मंत्र्याने कात्रीने नाही तर दातानी कापली फीत; पाहा व्हिडीओ

इस्लामाबाद | पाकिस्तानमध्ये लोकशाही म्हणजे एकप्रकारे थट्टाच समजली जाते. पाकिस्तानच्या सत्ताधाऱ्यांनी हे वेळोवेळी सिद्ध देखील केलं आहे. पाकिस्तानमधील वेगवेगळी व्हिडीओ नेहमी व्हायरल होत असतात. काही दिवसांपूर्वी चांद नबाव या पाकिस्तानी रिपोर्टरचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. त्यातच आता आणखी एक व्हिडीओ सध्या प्रचंड धुमाकूळ घालताना दिसत आहे.

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील कारागृहमंत्री फयाज अल हसन चोहान यांचा हा व्हिडीओ आहे. त्यांनी स्वत: हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. एका दुकानंचं उद्धाटन करण्यासाठी मंत्र्यांना आमंत्रण दिलं जातं. मंत्री उद्धाटनाला आले. मंत्र्यांच्या स्वागत केलं गेलं. त्यानंतर मंत्री महोदय उद्धाटनाची फीत कापण्यासाठी पुढे आले. मंत्र्याच्या हातात कात्री दिली गेली.

मंत्र्याला दिली गेलेल्या कात्रीची धारच नव्हती. त्यामुळे मंत्र्याला फीत कापता आली नाही. त्यानंतर मंत्री दाताने फीत कापू लागले. तरीही त्यांना फीत कापता आली नाही. त्यानंतर त्यांनी आणखी जोर लावला. अखेर मंत्र्याने करून दाखवलं. त्यांनी दाताने फीत कापली. त्यानंतर शेजारी उभ्या असलेल्या समर्थकांनी टाळ्या वाजवत त्यांचं कौतूक केलं.

दरम्यान, हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झालेला दिसत आहे. मंत्र्याच्या या कारनाम्यामुळे नेटकरी फयाज अल हसन चोहान यांची मस्करी करताना दिसत आहे. तर काहीजण त्यांची स्तुती देखील करत आहेत.

पाहा व्हिडीओ-

 

थोडक्यात बातम्या-

सुवर्णपदकानंतर ‘कांस्य’कमाई! अवनी लेखराने जिंकलं दुसरं वैयक्तिक पदक

‘पुन्हा सगळं बंद करण्याची वेळ आणू नका’; अजित पवारांचा थेट इशारा

Good Morning अण्णा! व्यंगचित्राच्या माध्यमातून राष्ट्रवादीचा अण्णा हजारेंना चिमटा

उद्यापासून राज्यात सलग तीन दिवस जोरदार पाऊस, ‘या’ भागांसाठी अलर्ट जारी

“भाजपचे कार्यकर्ते नुसते थुंकले तरी सरकार वाहून जाईल”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More