Top News

भाजप हा माझ्या बापाचा पक्ष, त्याचा मला अहंकार नाही तर प्रेम- पंकजा मुंडे

औरंगाबाद | भाजप हा माझ्या बापाचा पक्ष आहे आणि त्याचा मला अहंकार नाही, तर प्रेम आहे. त्यामुळे माझ्या बापाच्या पक्षाचा उमेदवार निवडून आणण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करणार, असं भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपच्या शिरीष बोराळकरांनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी पंकजा मुंडे बोलत होत्या.

एका व्यक्तीचं तिकीट कापून मी शिरीष बोराळकर यांच्या कार्यक्रमाला आले, त्यामुळे जो काही मेसेज द्यायचा तो मी दिला आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

दरम्यान, चंद्रकांत पाटील आणि माझी दोन दिवसांपूर्वीच भेट झाली होती. ते माझ्या घरी नाश्ता करण्यासाठी आले होते. यावेळी मराठवाडयातील बैठकांना उपस्थित राहू शकत नाही, याबद्दलही माझे त्यांच्याशी बोलणे झाले. ही संघटनेची आढावा बैठक होती, त्यापूर्वीच्या संध्याकाळी मी कोअर कमिटीच्या बैठकीला उपस्थित होते, असं पंकजा मुंडे यांनी सांगितलंय.

महत्वाच्या बातम्या-

“पवारांच्या आशीर्वादाने उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात सरकार पाच वर्षं पूर्ण करणार”

भाऊ-बहिणीच्या नात्यात पक्ष आडवा, माजी कृषी मंत्री गहिवरले

बिहारनंतर आता पश्चिम बंगालमध्येही निवडणूक लढवणार एमआयए

बॉलिवूड अभिनेते आसिफ बसरा यांची आत्महत्या

जमिनी खरेदी करणं हा तुमचा व्यवसाय आहे का? हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावं- किरीट सोमय्या

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या