Top News खेळ देश

बापरे… रिषभ पंतच्या फलंदाजीला घाबरुन हा खेळाडू सोडणार होता क्रिकेट!

Photo Courtesy- Twitter/BCCI

चेन्नई | भारताचा धडाकेबाज फलंदाज रिषभ पंत आपल्या फटकेबाजीमुळे चर्चेत असतो. आता तर पंतच्या  फटकेबाजीला भले भले गोलंदाज घाबरु लागले आहेत की अशी शंका यायला लागली आहे. त्याला कारणही तसंच आहे. कारण एका  गोलंदाजानं यासंदर्भात एक अत्यंत धक्कादायक वक्तव्य केलं आहे.

भारताचा मधल्या फळीतील धडाकेबाज फलंदाज रिषभ पंतने पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडच्या गोलंदाजांचा चांगलाच घाम काढला होता. पहिल्या डावात रिषभ पंतने ८८ चेंडूत ९१ धावांची खेळी केली होती. यामध्ये इंग्लंडचा फिरकीपटू जॅक लीचच्या ८ षटकात त्याने ७७ धावा वसुल केल्या होत्या.

माझ्या पहिल्याच भारत दौऱ्याच्या पहिल्याच सामन्यात पंतने माझी गोलंदाजी फोडून काढली. त्यामुळे मी पुन्हा खेळू शकेल यावर माझा विश्वास नव्हता. पण दुसऱ्या डावातील चांगल्या कामगिरीमुळे मी आनंदी आहे, असं मत इंग्लंडचा फिरकीपटू जॅक लीचने व्यक्त केलं आहे.

पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावात इंग्लंडच्या गोलंदाजांनी पंतला मैदानात टिकून न देता लगेच तंबूत परतवलं. दुसऱ्या डावात पंत ११ धावावर बाद झाल्याने इंग्लंडच्या गोलंदाजांनी सुटकेचा श्वास घेतला होता. या सामन्यात भारताला २२७ धावांनी पराभव पत्करावा लागला होता. या मलिकेतील पुढील सामना १३ फेब्रुवारीला चेन्नईत खेळवला जाणार आहे.

थोडक्यात बातम्या –

भाजप-मनसे युती होणार का?; देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितले…

साताऱ्यात ‘दंगल’… बारकाल्या पोरींची कॉलेजमध्ये तुफान हाणामारी, पाहा व्हिडीओ-

विधानसभा अध्यक्षपद पुण्याला मिळणार?; ‘या’ नेत्याच्या नावाची जोरदार चर्चा

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात धक्कादायक ऑडिओ क्लिप्स व्हायरल

एक नवरा, एक प्रियकर… आणखीही अनेकांसोबत संबंध, शेवट काळजाचा थरकाप उडवणारा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या