गुरुच्या लेकीचा पराभव करण्यासाठी खुद्द पंतप्रधान मोदी घेणार बारामतीत सभा!

बारामती |  पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना आपले राजकीय गुरू मानतात. त्यांच्या बोटाला पकडूनच मी राजकारणात पाऊल ठेवलं, असं मध्यंतरी मोदी एका जाहीर कार्यक्रमात म्हणाले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी शरद पवारांच्या लेकीला म्हणजेच सुप्रिया सुळेंना पराभूत करण्यासाठी बारामतीत महायुतीच्या उमेदवार कांचन कुल यांच्या समर्थनार्थ जाहीर सभा घेणार आहेत, अशी माहिती पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिलीय.

पंतप्रधान मोदींसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील बारामतीत सभा घेतील, असंही बापट यांनी सांगितलंय.

दरम्यान, आम्ही या लोकसभेला 43 जागा जिंकणार आहे आणि ती 43 वी जागा म्हणजे बारामतीती असेल, अशी वल्गणा करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी बारामतीच्या जागेसाठी मोठ्या प्रमाणावर फिल्डींग लावलेली दिसतीय.

महत्वाच्या बातम्या-

-कच्चा विद्यार्थी हिणवणाऱ्यांना कांचन कुल यांचं सडेतोड उत्तर

-विजय शिवतारेंचं ‘सेल्फी चॅलेंज’; सुप्रिया सुळे स्वीकारणार का?

-भाजपला ‘खामोश’ म्हणत शत्रुघ्न सिन्हा काँग्रेसवासी होणार! तारीख ठरली, मतदारसंघ ठरला

“माझी कुस्ती रेवडी होईल तर कुल-सुळेंची कुस्ती खरी होईल”

-“…शिवसेना तोपर्यंत खडसेंना मदत करणार नाही, ते संभ्रम निर्माण करतायेत”