मेरठ | दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचं अपहरण करुन सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली होती. उत्तर प्रदेशातील मेरठ गावातील चार मुलांनी पीडितेचं अपहरण करून हे कृत्य केल्याचं समोर आलं होतं. याप्रकरणातील मुख्य आरोपीला कोर्टात हजर करण्यासाठी नेत असताना आरोपीने पळण्याचा प्रत्यत्न केला. या दरम्यान पोलिसांनी या आरोपीला गोळी मारल्याची माहिती समोर आली आहे.
जखमी आरोपीस रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. दहावीच्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्काराच्या प्रकरणात मेरठच्या सरधना पोलिस ठाण्यात आरोपी लखन आणि विकास दोघांनाही आज कोर्टात हजर करण्यासाठी घेऊन जात होते.
लखन आणि विकास या दोघांना अटक करून न्यायालयात नेत असताना त्यांनी पोलिस कर्मचाऱ्याची पिस्तूल हिसकावून पळ काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी त्याच्यावर गोळी झाडली.
पीडित मुलीच्या भावाने पोलिसांत तक्रार दिल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. विद्यार्थीनी ट्यूशनला जात होती. त्यावेळी ती तरुणांसह आलेल्या गावातीलच एका तरुणाने तिला रस्त्यात अडवलं. त्यांनी तिला जबरदस्ती एका निर्मनुष्य घरात नेलं. तिथे आळीपाळीने तिच्यावर अत्याचार केले, अशी माहिती तक्रारीत देण्यात आली आहे.
थोडक्यात बातम्या-
कोरोनाची दुसरी लाट सर्वात खतरनाक, मुंबईची दिवसभराची आकडेवारी अत्यंत धक्कादायक
महाराष्ट्राची आजची कोरोनाबाधितांची आकडेवारी, एक पाऊल लॉकडाऊनच्या दिशेने!
“उद्धव ठाकरेंना तुमच्याकडेच ठेवा अन् रोज उठून सलाम ठोकत बसा”
पुण्यात 6 ते 6 संचारबंदीचा पहिलाच दिवस अन् कोरोनाबाधितांचा आकडा काळजाचा थरकाप उडवणारा!
लसीकरणानंतर मद्यपान केल्यास विपरीत परिणाम होतात का? तज्ज्ञ डॉक्टरांचे स्पष्टीकरण
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.