Top News देश

काँग्रेसने 50 वर्षे विनाशकारी निती अवलंबल्यामुळेच देशातील शेतकरी राहिला गरीब- प्रकाश जावडेकर

नवी दिल्ली | काँग्रेस नेते राहुल गांधींनी मोदी सरकारवर कृषी कायद्यावरून जोरदार टीका केली होती. या टीकेला केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी जोरदार प्रत्युत्तर देत राहुल गांधींवर पलटवार केला आहे.

काँग्रेसने देशावर तब्बल 50 वर्षे राज्य केलं. तेव्हा एकाच परिवाराची सत्ता होती. आज देशाचा शेतकरी गरीब आहे तर तो कुणाच्या नितीमुळे? काँग्रेसने 50 वर्षे विनाशकारी निती अवलंबल्यामुळेच देशातील शेतकरी गरीब राहील असल्याचं प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे.

कोणत्याही परिस्थितीत ही चर्चा यशस्वी होऊ द्यायची नाही आणि शेतकऱ्यांच्या समस्यांवर तोडगा निघावी अशी काँग्रेसची इच्छा नाही, असा आरोप प्रकाश जावडेकर यांनी केला आहे.

दरम्यान, काँग्रेस नेत्यांचा आरोप आहे की, 4-5 परिवार देशावर हावी आहेत. पण असं नाही, देशावर आता कोणत्याही परिवाराची सत्ता नाही. देशावर 125 कोटी जनतेचं राज्य असल्याचं जावडेकर म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

‘शेतकरी आंदोलनात खलिस्तानी एके-47 घेऊन फिरत आहेत’; ‘या’ भाजप खासदाराचा दावा

भाजपने बदललं ड्रॅगन फ्रूटचं नाव, गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी ठेवलं ‘हे’ नवीन नाव!

“भारतीयांनो खरा संघ येतोय तुम्हाला तुमच्याच घरात पराभूत करायला, सतर्क रहा”

‘माझे वीजबिल, मलाच झटका…; वीजपुरवठा खंडीत करण्याच्या निर्णयावरुन भाजपची सरकारवर टीका

गांजाचा वापर करुन कोरोना रुग्णांना वाचवता येऊ शकतं; पाहा कुणी केलाय ‘हा’ दावा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या