महाराष्ट्र मुंबई

हे सरकार अहंकाराच्या भावनांनी भरलेलंय, यांना मुंबईची चिंता नाही- प्रवीण दरेकर

मुंबई | महाविकास आघाडी सरकारने प्रस्तावित असलेल्या आरे येथील मेट्रो कारशेडचा काम हे कांजूरमार्ग येथे हलवण्याचा निर्णय घेतलेला आहे. या निर्णयाला विरोध करण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चातर्फे अंधेरीच्या मेट्रो रेल्वे स्टेशन समोर धिक्कार मोर्चा काढण्यात आला. यावेळी बोलताना विधानसभेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सरकारवर निशाणा साधलाय.

हे सरकार अहंकाराच्या भावनांनी भरलेलं असल्यामुळे त्यांना मुंबईकरांची कुठलीच चिंता नाही आणि त्यामुळे अशा पद्धतीचे निर्णय सरकारकडून घेतले जात असल्याचा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला आहे.

मुंबईकरांसाठी सर्वाधिक प्राधान्याचा विषय वाहतूक आहे. मुंबईकरना दररोज वाहतुकीच्या समस्यांना सामोरे जावे लागतं, हे ठाकरे सरकारला कधीच समजणं शक्य नाही कारण ते घरातच बसून असतात, अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केलीये.

महत्वाच्या बातम्या-

महाराष्ट्रात पप्पू सेनेला माझ्याशिवाय करमत नाही का?- कंगणा राणावत

भगतसिंह कोश्यारींनी उद्धव ठाकरेंना पाठवलेल्या पत्रावर अमित शहा नाराज; म्हणाले…

…हे चांगल्या राज्यकर्त्याचं लक्षण नाही- संजय राऊत

मुख्यमंत्र्यांनी घराबाहेर पडलं पाहिजे- खासदार संभाजीराजे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या