बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भाजप नेते प्रविण दरेकरांना मोठा धक्का; वाचा काय आहे प्रकरण

मुंबई | महाविकास आघाडी सरकारविरुद्ध सध्या सतत जोरदार टीका करणारे भाजप आमदार प्रविण दरेकर यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. मुंबई बँकेच्या विविध शाखांमध्ये भाडे करार, अधुनिकीकरण, संगणकीकरण आणि फर्निचर खरेदीच्या व्यवहरांमध्ये गंभीर त्रुटी अढळल्या आहेत. मात्र आता या मुंबई बँकेच्या गैरव्यवहारच्या प्ररकरणाबद्दल खोलात चौकशी होणार असल्याचं समोर आलं आहे.

नाबार्ड यांनी दिलेल्या अहवालानंतर प्राथमिक माहितीनुसार सरकार विभागाने या प्रकरणाचा खोलवर आॅडिट करण्याचा निर्णय घेतल्याचं समोर आलं आहे. आता सर्व शाखांचे ऑडिट होईल. त्यामधून आता काय समोर येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपने विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमवून वाढीव वीजबिल आणि शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडण्याच्या निषार्धात आंदोलन करत जोरदार घोषणा केली.

यादरम्यान भाजप नेते राम सातपुते कृषी पंप घेऊन थेट विधानभवनात गेले. त्यानंतर वाढीव वीजबिल फाडून त्यांनी सरकारचा निषेध नोंदवला आहे. एवढचं नाही तर घोषणाबाजी करत सरकारने वीज कनेक्शन तोडणी न थांबवल्यास कृषी पंप सरकारच्या डोक्यात फोडण्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे.

थोडक्यात बातम्या-

धक्कादायक! भररस्यात घडलेल्या ‘या’ घटनेनं पुणे हादरलं

सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा फटका; घरगुती गॅस सिलेंडर पुन्हा ‘इतक्या’ रूपयांनी महागला

पोलिसांत तक्रार केल्यामुळे मुलीच्या वडिलांना घातल्या गोळ्या; हाथरसमधील अंगावर काटा आणणारा व्हिडिओ

काँग्रेस प्रवक्ते राजू वाघमारेंच्या भावाला बलात्कार प्रकरणात अटक

“एकाला एक दुसऱ्याला दुसरा न्याय नको, धनंजय मुंडेंचाही राजीनामा घ्या”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More