मोदीजी, विदेशात गेल्यावर त्या मोदीलाही घेऊन या!

शिलाँग | पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी विदेश दौऱ्यावर जात असतात. मोदीजी, पुढच्या वेळी विदेशात गेल्यावर त्या मोदीलाही घेऊन या, असा टोला राहुल गांधी यांनी लगावला आहे. मेघालयमधील निवडणूक प्रचारसभेत ते बोलत होते.

पीएनबी घोटाळ्यावरुन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना सरकारला चांगलेच धारेवर धरले आहेत. त्यातच त्यांनी मोदींना अशाप्रकारे टोला लगावल्याने उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. 

 ‘नीरव मोदी हिरे विकतो. हिऱ्यांना आपण स्वप्नातील वस्तू म्हणतो. खरे तर त्याने अनेक लोकांची स्वप्ने विकली आहेत. काही वर्षांपूर्वी मोदींनीही भारतीय जनतेला स्वप्ने विकली होती. सर्वांच्या बँक खात्यात 15 लाख रुपये, 2 कोटी नोकऱ्यांसह अनेक स्वप्नांचा त्यात समावेश होता,’ असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.