Raj Thackeray | ‘3 तारखेनंतर भोंगे हटवले नाहीत तर…’; राज ठाकरेंचा इशारा
पुणे | मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) सध्या पुणे दौऱ्यार आहेत. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेत दोन मोठ्या घोषणा केल्या आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांना विरोध करत हनुमान चालिसा लावण्याचे आदेश मनसैनिकांना दिले आहेत. यामुळे गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे.
देशभरातील सर्व हिंदू बांधवांना माझं सांगणं आहे की, तयारीत रहा, तीन तारखेपर्यंत रमजान सुरू आहे. तोपर्यंत काही बोलणार नाही. त्यानंतरही त्यांना कळलं नाही आणि सर्वोच्च न्यायालयापेक्षा यांना स्वतःचा धर्म महत्वाचा वाटत असेल तर आपणही जशास तसे उत्तर देणं देखील तितकंच गरजेचं आहे, असा इशारा राज ठाकरंनी दिला आहे.
आमच्याकडून मिरवणूक निघत असताना त्यावर दगडफेक होणार असेल तर आम्ही शांत बसणार नाही, आमचे हात काही बांधलेले नाहीत. दगड आम्हालाही हातात घेता येतो. समोर जे कोणतं हत्यार असेल ते आमच्याही हातात द्यायला लावू नका, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा जाहीर केला आहे. 5 जून रोजी राज ठाकरे आपल्या पक्षाच्या नेत्यांसह अयोध्येला जाणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
पत्रकार परिषद घेत राज ठाकरेंनी केल्या ‘या’ दोन मोठ्या घोषणा
धक्कादायक ! भर उन्हात लग्नात डान्स केल्यानं तरुणाचा मृत्यू
18 ते 20 एप्रिल दरम्यान ‘या’ भागात उष्णतेचा कहर, वाचा हवामान खात्याचा इशारा
100 कोटींच्या शौचालय घोटाळ्याप्रकरणी किरीट सोमय्यांची सारवासारव, म्हणाले…
मोठी बातमी ! लोटे एमआयडीसीत पुन्हा भीषण आग, कोट्यावधींचं नुकसान
Comments are closed.