“भाजपवाले पैसे वाटतील… यांनी देश लुटलाय… आता वेळ आलीय यांना लुटायची”

सोलापुर |  भाजपवाले पैसे वाटतील… त्यांनी वाटले तर घ्या. यांनी देश लुटलाय आता वेळ आलीय त्यांना लुटायची… परत यांच्याकडे ढुंकूनही पाहू नका…. अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे सत्ताधारी भाजपवर तुटून पडले.

राज ठाकरे यांची आज सोलापुरात सभा होत आहे. या सभेत त्यांनी भाजपची पोलखोल करत भाजपची चांगलीच डोकेदुखी वाढवली.

नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना तर नाहीच नाही, पण या दोघांना मदत होऊ शकेल अशाही कुणाला मतदान करू नका, असं आवाहनही राज ठाकरे यांनी केलं.

प्रत्येक भारतीय जनतेच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करू हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आश्वासन होतं.  त्यानंतर हा चुनावी जुमला आहे, असं अमित शाह यांनी सागितलं. लोकांनो तुम्हाला मूर्ख बनवलंय ह्यांनी… अशा मुद्दांवर राज ठाकरेंनी भाष्य केलं.

महत्त्वाच्या बातम्या

-राज ठाकरेंनी भर सभेत भाजपच्या स्वंयघोषित विकासचा बुरखा फाडला!

-“काय झालं मेक इन इंडियाचं? कोणाला कामं मिळाली? काय झालं स्टार्ट अप इंडियाचं?”

-“आमच्या महाराष्ट्रातल्या मुला मुलींना रोजगार द्या; आपल्याला आरक्षणाची गरजच नाही”

-आमच्या सभांचा खर्च मोजण्यापेक्षा तुम्ही थापा किती मारल्या हे मोजा- राज ठाकरे

-भाजपला मतदान करा; मराठवाड्याचा कॅलिफोर्निया करतो- नितीन गडकरी