मुंबई | जागतिक महिला दिनाच्यानिमित्तीने मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी फेसबुकवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये राज ठाकरे यांनी महिलांसाठी खास संदेश लिहला आहे.
8 मार्च, आज जागतिक महिला दिन. मुळात महिला दिन हा वर्षातून एकदाच का साजरा करायचा हे मला समजत नाही. आमचे आजोबा, प्रबोधनकार ठाकरे म्हणायचे, बांधवांनो, महिलांबद्दल जितका-जितका आदर तुम्ही आपल्या अंतःकरणात साठवत जाल, वाढवत जाल तितके शिवराय तुमच्यावर फार प्रसन्न होतील” त्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जशी 365 दिवस साजरी व्हायला हवी तसंच महिलांचा म्हणजे खऱ्या अर्थाने ह्या जगतनियंत्याचा सन्मान 365 दिवस साजरा झाला पाहिजे, असं राज ठाकरेंनी सांगितलं आहे.
राजकारणात आणि समाजकारणात असणाऱ्या महिलांनी कोणाचंही प्यादं बनून राहायची गरज नाही. तुम्ही निर्णयप्रक्रियेत सहभागी होऊन बदल घडवला पाहिजे, असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं आहे.
मी मागे एकदा एका भाषणात माता-भगिनींना उद्देशून जे बोललो होतो ते आज पुन्हा सांगतो; तुम्हाला कोणी सक्षम करण्याची गरज नाही तुम्ही स्वतः सक्षमच आहात. तुम्ही तुमच्या सद्सद्विवेक बुद्धीला स्मरून आणि दुसऱ्या स्त्रीचं दुःख आपलं मानून कृती करू लागलात तर जगात कुठल्याच स्त्रीवर अन्याय होऊ शकणार नाही, असंही राज ठाकरे म्हणलेत.
थोडक्यात बातम्या-
सासू सासऱ्यांनी केलं सूनेचं कन्यादान; बुलडाण्यातील स्तुत्य घटना
अमृता फडणवीसांनी शेअर केला आणखी एक व्हिडिओ; पाहा व्हिडिओ
महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार?; अजित पवार ‘हा’ मोठा निर्णय घेण्याची शक्यता
कर्नाटकमधील मंत्र्याच्या SEX CD प्रकरणात आला हा मोठा ट्विस्ट!
कामगारांच्या मुलांचा शिक्षणापासून लग्नापर्यंतचा खर्च सरकार करणार; सरकारकडून ही योजना लागू
Comments are closed.