बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाराष्ट्रात 15 दिवसांचा लाॅकडाऊन लागणार?; आरोग्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य

मुंबई | महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचं चित्र दिसून येत असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज टास्क फोर्सची बैठक घेतली. या बैठकीमध्ये लाॅकडाऊनसारखे कडक निर्बंध राज्यात लागू करा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.

राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी याच पार्श्वभूमीवर कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने महाराष्ट्रात ‘आयसीएमआर’च्या नियमाप्रमाणे 15 दिवसांचा कडक लॉकडाऊन गरजेचा असल्याचं बोलून दाखवलं आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर आरोग्य मंत्री यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा लॉकडाऊन होणार असल्याची चिन्हं दिसून येत आहेत.

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या देशपातळीवरील शहरांच्या यादीत दहापैकी नऊ शहरं ही महाराष्ट्रातील असल्याने केंद्र सरकारनेही महाराष्ट्रात दुसरी लाट आली असल्याचा इशारा दिला होता. त्यानंतर प्रत्येक जिल्ह्यातील प्रशासनाला परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेण्याचे आदेश राज्य सरकारतर्फे करण्यात आले. तसेच महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात स्थानिक प्रशासनाने कडक लॉकडाऊन तसेच काही प्रमाणात निर्बंध अशाप्रकारे नियम लागू केले.

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितल्याप्रमाणे कोरोना बरा होण्यासाठी 15 दिवसांचा कालावधी लागतो. तसेच नागरिकांचा निष्काळजीपणा आणि नियम न पाळण्याच्या आडमुठी धोरणामुळे लॉकडाऊन गरजेचा असल्याचं दिसून येत आहे. राजेश टोपे यांनी सांगितलं की, ‘आयसीएमआर’च्या नियमाप्रमाणे 15 दिवसांचा लॉकडाऊन कोरोनाची पूर्ण साखळी तोडण्यासाठी उपयुक्त असतो. त्यामुळे आता राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन सदृश्य परिस्थिती झाल्याचं दिसून येत आहे.

थोडक्यात बातम्या –

पुण्यातील कोरोना रुग्णांची वाढ काही थांबेना, आजही आकडेवारी धडकी भरवणारी

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पारंपारिक नृत्य करून साजरी केली होळी, पाहा व्हिडिओ

सचिन वाझेच्या अडचणीत आणखी वाढ; NIA पथकाला नदीपात्रात आढळले महत्वाचे पुरावे

मोठी बातमी!!! महाराष्ट्रात पुन्हा लाॅकडाऊन?; मुख्यमंत्र्यांचे तयारीला लागण्याचे आदेश

रिषभ पंतच्या ‘त्या’ शॉटचा सातासमुद्रापार जलवा, न्यूझीलंडच्या बॅटसमनने मारला रिव्हर्स स्कूप, पाहा व्हिडीओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More