“आज माझा विधिमंडळात होता फेर फटका, कारण मला द्यायचा आहे महाविकास आघाडीला झटका”
मुंबई | राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन पहिल्याच दिवसापासून वादळी ठरलं. अर्थसंकल्पीय अधिवेशन अनेक मुद्द्यांमुळे गाजत असताना विधानसभेचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पेनड्राईव्ह बॉम्ब टाकत विधानसभा हादरवून सोडली.
देवेंद्र फडणवीसांनी 125 तासांच्या स्टिंगमधील काही महत्त्वाचे भाग 29 वेगवेगळ्या पेनड्राईव्हच्या माध्यमातून सादर केले. भाजप नवाब मलिकांच्या (Nawab Malik) राजीनाम्याच्या मागणीवर ठाम असताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawle) यांनी विधिमंडळात हजेरी लावली.
रामदास आठवले यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांच्या खास शैलीत महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. ‘आज माझा विधिमंडळात होता फेर फटका…कारण मला द्यायचा आहे महाविकास आघाडीला झटका’, अशी टिप्पणी रामदास आठवले यांनी केली आहे.
दरम्यान, नवाब मलिक यांच्यावर गंभीर आरोप आहेत. परंपरेनुसार महाराष्ट्राच्या अस्मितेला डाग आहेत. तुरूंगात असून ते मंत्री राहू शकत नाही. ते तुरूंगात असून त्यांचा राजीनामा घेतला जात नाही. महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) भूमिका अत्यंत चुकीची आहे, अशी टीका आठवलेंनी केली आहे.
थोडक्यात बातम्या-
“सरकार आणखी खोलाशी जाईल आणि दुसरा पेनड्राईव्ह घेऊन समोर येईल”
“कुणी कितीही सरकार पाडण्याचा प्रयत्न केला तरी ठाकरे सरकार 5 वर्षे टिकणार”
“देवेंद्र आहेत ते, तळपती तलवार, भ्रष्टाचाऱ्यांनो आता लवकरच…”
फडणवीसांच्या पेन ड्राईव्ह बाॅम्बवर शरद पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले….
विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळणार आणि गाराही पडणार, ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी
Comments are closed.