बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘कुणी मायीचं दूध पिलेला असेल तर..’; रावसाहेब दानवेंचं विरोधकांना ओपन चॅलेंज

जालना | भाजप नेते रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी विरोधकांना ओपन चॅलेंज दिलं आहे. भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी जालन्यात जाऊन शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. यानंतर खोतकरांनी रावसाहेब दानवेंकडे बोट दाखवलं.

या आरोप प्रत्यारोपांनंतर दानवे विरूद्ध खोतकर हा जुना वाद पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता आहे. किरीट सोमय्यांचा बोलवता धनी केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे असल्याचा आरोप खोतकरांनी (Arjun Khotkar) केला होता. यानंतर रावसाहेब दानवेंनी विरोधकांना खुलं आव्हान दिलं आहे.

‘मी कोणावरच कशाचाही आरोप केलेला नाही.माझ्या अंगाला कुठलाही भ्रष्टाचार चिटकलेला नाही आणि असेल तर कुणी मायीचं दुध पिलेला असेल तर माझा भ्रष्टाचार काढून दाखवा,’ असं खुलं आव्हान रावसाहेब दानवेंनी दिलं आहे.

दरम्यान, राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांत भ्रष्टाचाराचे आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. तर ‘मी गरीब माणूस आहे, माझ्या नावाने बोंबलून काही फायदा नाही. ज्या गावात मतदान बुथ नव्हते, त्या गावचा मी आज केंद्रात मंत्री आहे,’ असंही रावसाहेब दानवे विरोधकांना उद्देशून म्हणाले आहेत.

थोडक्यात बातम्या-

“700 आंदोलक शेतकऱ्यांच्या मृत्यूला राकेश टिकैतच जबाबदार”

प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याप्रकरणी देवेंद्र फडणवीसांच्या अडचणी वाढल्या!

लग्नात फोटो काढण्याची परवानगी नसतानाही विकी आणि कतरिनाचा पहिला फोटो व्हायरल

चैत्यभूमीवर समीर वानखेडेंच्याविरोधात घोषणबाजी, नवाब मलिक म्हणाले..

“कधी कुणाला दहशतवादी समजून गोळ्या घातल्या जातात तर कधी देशद्रोही ठरवून जेलमध्ये टाकलं जातं, आता फक्त…”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More