बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

रवि शास्त्रींनी नवीन प्रशिक्षक राहूल द्रविडबदद्ल व्यक्त केलं ‘हे’ मत

नवी दिल्ली | भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी संघाचा माजी फलंदाज राहूल द्रविड याची निवड करण्यात आली आहे. तर माजी प्रशिक्षक रवि शास्त्री यांचा संघासोबतचा प्रवास संपला आहे. 17 नोव्हेंबरपासून राहूल द्रविड प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्विकारताना दिसणार आहे. याबद्दल रवि शास्त्री यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

शास्त्री राहूलबद्दल बोलताना म्हणाले, “राहूलला प्रशिक्षणासाठी एक महान संघ मिळाला आहे. राहूलला केवळ खेळाडूंच्या खेळाचा दर्जा वाढवण्याची गरज पडणार आहे. संघातली अनेक खेळाडू अजून 3-4 वर्षे सहज खेळू शकतील. त्यामुळे संघात बदल होणार नाही. हे खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे, असं मत त्यांनी व्यक्त केलं.

विराटने देखील कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. शास्त्रींनी यावेळी विराटचंही कौतुक केलं आहे. ते म्हणाले विराटने कर्णधार म्हणून उत्तम कार्य केलं आहे. संघाच्या यशाचे श्रेय विराटला जातं, अशा शब्दात शास्त्रींनी विराटचे आभार मानले आहेत.

रवि शास्त्री 2017 पासून रवि शास्त्री भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहिले आहेत. शास्त्रींनी जवळपास 6 ते 7 वर्षे प्रशिक्षकपदाची जबाबदारी पार पाडली आहे. याकाळात भारतीय संघाने अनेक सामन्यात यश मिळवलं आहे. मात्र त्यांच्या कार्यकाळात आयसीसी सामन्य संघाची कामगिरी फारसी समाधनकारक राहिली नव्हती.

थोडक्यात बातम्या-

‘उनकी नींद खो गई, अब चैन खोने का वक्त’; पत्रकार परिषदेआधी नवाब मलिकांचं ट्विट

नवाब मलिकांनी केलेल्या आरोपांनंतर क्रांती रेडकरच्या बहिणीनं उचललं ‘हे’ पाऊल

ट्विटरवर जगातील दुसरे सर्वात प्रभावशाली व्यक्ती ठरले पंतप्रधान नरेंद्र मोदी!

न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यासाठी भारतीय संघ जाहीर; टी 20 संघाच्या कर्णधारपदाची धुरा ‘या’ खेळाडूकडे

आधी लस घ्या मगच पेट्रोल, गॅस आणि रेशन मिळवा; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More