राहुल गांधी विमान निर्मिती करणाऱ्या कंपन्यांचे दलाल- रविशंकर प्रसाद

नवी दिल्ली | काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी विमान निर्मिती करणाऱ्या कंपन्यांचे दलाल म्हणून काम करत आहेत, असं म्हणत केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी टीका केली आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.

राहुल गांधी यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन राफेल प्रकरणावरुन नरेंद्र मोदींवर गंभीर आरोप केले. यावर रविशंकर प्रसाद यांनी पलटवार केला आहे.

राहुल यांना एअरबस या कंपनीचा ईमेल कसा मिळाला? काँग्रेस सरकारच्या काळातले एअरबसचे अनेक व्यवहार संशयास्पद असल्याच आरोप त्यांनी केला आहे.

दरम्यान, राफेल कराराच्या 10 दिवस आधीच अनिल अंबानींना यासंदर्भात माहिती कशी मिळाली. मोदींनी याबाबतचं उत्तर द्यावं, असा सवाल राहुल गांधी यांनी केला होता.

महत्वाच्या बातम्या-

…तर भाजपचे ‘हे’ मंत्री लोकसभेच्या रिंगणात उतरणार?

काँग्रेसचे ‘हे’ चार आमदार राजीनामा देणार?

-“आ देखे जरा किसमे कितना है दम”; ज्योतिरादित्य शिंदेंचं भाजपला आव्हान

नरेंद्र मोदींना तुरुंगात टाकलं पाहिजे- राहुल गांधी

निवडणूकीआधी 5 कोटी घरांवर पक्षाचा झेंडा फडकवण्याचा भाजपचा संकल्प