नागपूर | ठाकरे सरकारने भाजपसह राज्यातील इतर नेत्यांना पुरवण्यात येणाऱ्या सुरक्षा व्यवस्थेत कपात करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भाजप नेते आक्रमक झाले असून सरकारवर टीका करत आहेत. मात्र अशातच महाविकास आघाडीचे शिल्पकार आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी गुगली टाकली आहे.
भाजप नेत्यांनी कमी करण्यात आलेल्या सुरक्षेवरून आक्षेप घेतला आहे. मात्र गृहमंत्री अनिल देशमुख यांना शरद पवारांनी फोन करत माझी सुरक्षा कमी करा अशी मागणी केली आहे.
इतर नेत्यांची सुरक्षा कमी केली आहे तर माझी पण सुरक्षा कमी करा असं शरद पवारांनी म्हटलं आहे. एकीकडे भाजपचे नेते सुरक्षा कमी केल्यामुळे सरकारवर टीका करत आहेत. तर पवारांनी अशा प्रकारची मागणी करत गुगलीच टाकली आहे.
दरम्यान, ठाकरे सरकारने भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रविण दरेकर, प्रसाद लाड, यांच्याही सुरक्षा व्यवस्थेत कपात केली आहे.
थोडक्यात बातम्या-
अभिनेत्री भाग्यश्री मोटेचा हाॅट अंदाज; चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंटचा पाऊस
ऑस्ट्रेलियन चाहत्यांकडून पुन्हा वर्णद्वेषी टीका, खेळ थांबवण्याची आली वेळ, पहा व्हिडीयो
सेक्स पोजिशन ट्राय करण्याच्या नादात तरुणाचा मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण
एका बायकोवरुन दोन जणांच्या गटात तुफान हाणामारी; सहा जणांना अटक