बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘सर, बेइज्जती केली जातेय…’, अन् समीर वानखेडे वैतागून भडकले

मुंबई | एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी गंभीर स्वरूपाचे आरोप करत त्यांचं खासगी आयुष्य संपुर्ण राज्यासमोर आणलं. यामुळे वैतागलेले समीर वानखेडे हे अखेर आज भडकले तसेच माझ्यावर खुप दबाव येत असून रोज माझी मीडियासमोर बेइज्जती केली जात असल्याची तक्रार त्यांनी मागासवर्ग आयोगाच्या उपाध्यक्षांकडे केली आहे.

‘माझी नोकरी काढून घेतली जाणार, माझा युनिफाॅर्म काढून घेतला जाणार, सारखं माझी माध्यमांसमोर पत्रकार परिषदा घेऊन बदनामी केली जात आहे. मला राष्ट्रपती नियुक्त करतात त्यामुळे जर मी काही चुक केलं तर राष्ट्रपती त्यावर निर्णय घेतील, त्यामुळे कायद्याच्या चौकटीत राहून या प्रकरणाची चौकशी करा’, अशी या सर्व घटनेला वैतागून समीर वानखेडेंनी तक्रार मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांकडे केली आहे.

समीर वानखेडे यांचं एकुणच संपुर्ण कुटूंब या आरोप प्रत्यारोपाच्या प्रकरणामुळे अडचणीत सापडल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे त्यांना मोठ्या मानसिक त्रासाला सामोरं जावं लागत आहे. त्याच पार्श्वभूमीवर समीर वानखेडेंनी बोलताना म्हटलं आहे की, मला आणि माझ्या कुटूंबीयांना धमकावलं जात आहे. तसेच आम्हाला टार्गेट केलं जात आहे.

यावेळी बोलत असताना समीर वानखेडे हे अत्यंत वैतागलेले आणि भडकलेले असल्याचं त्यांच्या एकंदर बोलण्यातून स्पष्टपणे दिसून येत होतं. त्यामुळे या प्रकरणात आता आरोप प्रत्यारोपांचं हे सत्र कधी थांबणार?, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या

मुंबईच्या कोरोना जाणून घेणे कमी अधिक प्रमाणात घट, आजची मागणी घ्या

मोठी बातमी! माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती आली समोर

न्यूझीलंडविरुद्ध भारतीय संघात मोठे बदल; सलामीला उतरणार ‘हा’ धमाकेदार फलंदाज

“महाविकास आघाडी ही क्रिकेट टीम प्रमाणे ‘बेस्ट ऑफ इलेव्हन’ टीम”

आर्यन खानला कसं अडकवलं?, याबाबत नवाब मलिकांचा मोठा दावा, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More