बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘संजय राऊत यांच्या सारख्या बकबक करणाऱ्यांची चौकशी करा’; ‘या’ काँग्रेस नेत्याची मागणी

मुंबई | सचिन वाझे प्रकरणावरून काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं आहे. संजय निरुपम यांनी सचिन वाझे आणि शिवसेना यांच्या संबंधावरुन टीका करत शिवसेना नेता संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. संजय निरुपम यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे.

संजय राऊत हे पहिल्यांदा सचिन वाझे प्रामाणिक अधिकारी असल्याचं म्हणत होते, आता ते वाझे यांच्या नियुक्तीच्या विरोधात असल्याचं सांगतात. एनआयएनं आता संजय राऊत यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करावी, अशी मागणी संजय निरुपम यांनी केली आहे.

संजय राऊत यांनी वाझे कोणत्या नेत्यांच्या खांद्यावर बसून पोलीस दलात परत आले, राष्ट्रीय तपास यंत्रणेनं राऊत यांना उचलून चौकशी करुन त्यांच्यामागील सूत्रधारापर्यंत पोहोचावं, असं संजय निरुपम म्हणाले आहेत.

दरम्यान, जेव्हा सचिन वाझेंना परत पोलीस सेवेत घेतलं होतं, तेव्हाच काही वरीष्ठ नेत्यांशी बोलताना मी म्हणालो होतो की, त्यांच्यामुळे पुढे अडचणी निर्माण होतील. काही वरिष्ठ आणि प्रमुख नेत्यांशी बोलताना म्हणालो होतो की, या अधिकाऱ्याचा स्वभाव आणि काम करण्याची पद्धत पाहाता आपल्यापुढे अडचणी निर्माण करू शकतील. हे बोललो, ते नेतेही सांगतील. कोणताही अधिकारी वाईट नसतो, त्याला परिस्थिती वाईट बनवत असते. ज्या पद्धतीने हे प्रकरण घडलं, त्यावर कदाचित कुणाचं नियंत्रण राहिलं नसेल. यातून अनेक मंत्र्यांनाही धडा मिळाला असेल, असं संजय राऊत यांनी म्हणाले आहेत.

 

थोडक्यात बातम्या-  

सचिन वाझेंची तब्येत पुन्हा बिघडली; उपचारासाठी जे.जे. रुग्णालयात हलवलं

धक्कादायक! तक्रार दाखल करण्यासाठी गेलेल्या तरूणालाच पोलिसांनी केली मारहाण

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त धनंजय जाधव यांचं निधन!

खळबळजनक! दिल्लीत भाजप नेत्याने गळफास घेत केली आत्महत्या

“नरेंद्र मोदींसारखे दुसरे पंतप्रधान देशाच्या इतिहासात झाले नसतील”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More