मुंबई | पेट्रोल डिझेलच्या भाववाढीवरून आजच्या सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेनं केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे. राममंदिरासाठी ‘चंदा वसुली’ करण्यापेक्षा पेट्रोल-डिझेलचे भाव चंद्राला भिडत आहेत, ते खाली आणा. त्यामुळे रामभक्तांच्या चुली पेटतील आणि श्रीरामही खूश होतील, अशी टीका शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून मोदी सरकारवर केली आहे.
लोकांनी वाहने खरेदी केली ती कामधंद्याच्या सोयीसाठी. ही सर्व वाहने रस्त्यावर सोडून एक दिवस लोकांना घरी जावं लागेल. मग बसा बोंबलत, असा इशारा शिवसेनेनं मोदी सरकारला दिला आहे.
तिकडे केंद्रातील भाजप सरकार ‘सोनार बंगला’ घडविण्यासाठी कोलकात्यात तळ ठोकून बसले आहे आणि देशाला पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीने होरपळून टाकले आहे. या महागाईवर सरकार पक्ष मूग गिळून गप्प बसला आहे. एरवी महाराष्ट्रात ऊठसूट आंदोलने करणारा भाजपनामक विरोधी पक्ष पेट्रोल-डिझेल दरवाढीवर गप्प का बसला आहे?, असा सवाल शिवसेनेनं विचारला आहे.
आधीच्या सरकारांनी देशाचे तेल आयातीवरील अवलंबित्व कमी केले असते तर मध्यमवर्गीयांवर महागाईचा भार पडला नसता, हे मोदी यांचं वक्तव्य म्हणजे त्यांच्या बोलघेवडेपणास साष्टांग दंडवत घालावं असंच आहे, असा टोलाही शिवसेनेनं सामनातून लगावला आहे.
थोडक्यात बातम्या-
‘पक्ष सर्वांनाच वाढवायचा आहे, कोरोना नाही’; मुख्यमंत्र्यांनी सर्व पक्षांना खडसावलं
रुबीना दिलैक ठरली बिग बॉस 14 ची विजेती!
मुंबई महापालिका निवडणूकीसदंर्भात संजय राऊतांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
तृणमूल काँग्रेसला धक्का! कोळसा चोरी प्रकरणी सीबीआयने केली ‘ही’ मोठी कारवाई
धक्कादायक! पुण्यात Tiktok स्टार समीर गायकवाडने केली आत्महत्या