महाराष्ट्र मुंबई

“बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबादचं नामांतर तीस वर्षांपूर्वीच केलं”

मुंबई | शिवसेनेनं भूमिका बदललेलीच नाही. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी तीस वर्षांपूर्वीच जाहीरपणे औरंगाबादचं संभाजीनगर केलं. हे नामांतर लोकांनी स्वीकारलं. प्रश्न राहिला सरकारी कागदपत्रांचा. त्यावरही लवकरच दुरुस्ती होईल. भाजपस त्याची काळजी नको, असं म्हणत शिवसेनेनं सामनामधून भाजपवर टीका केलीये.

औरंगाबाद शहराचे नामांतर संभाजीनगर असे करण्यास काँग्रेसने विरोध केला आहे. यावर भाजपास गलिच्छ उकळय़ा फुटल्या आहेत. काँग्रेसचा हा विरोध आजचा नाही. जुनाच आहे, असं म्हणत काँग्रेसच्या या भूमिकेचा संबंध महाविकास आघाडीच्या ध्येयधोरणांशी जोडणं मूर्खपणाचं आहे, असं स्पष्टीकरण शिवसेनेनं दिलं.

महाराष्ट्राचे सरकार किमान समान कार्यक्रमाच्या अंमलबजावणीशी बांधील आहे. न्न, वस्त्र, निवारा, पददलितांना न्याय, शेतकरी, कष्टकऱयांना बळ देण्याचा हा कार्यक्रम आहेच. तरीही कोणत्याही राज्याला धर्माचे व सरकारला स्वाभिमानाचे अधिष्ठान हवेच! औरंगजेब हा काही महाराष्ट्र धर्म किंवा स्वाभिमानाचे प्रतीक नाही. हे काँग्रेसवालेही मान्य करतील.औरंग्या हा काही सेक्युलरही नव्हता, हे समजून घेतले पाहिजे. भाजपवाल्यांनी चिंतातुर जंतूप्रमाणे उगाच वळवळ करू नये, असं म्हणत शिवसेनेनं भाजपवर निशाणा साधला.

शिवसेनेने आपली भूमिका बदललेलीच नसल्याचं शिवसेनेने सांगितल. तसेच ‘बाळासाहेब ठाकरे यांनी तीस वर्षांपूर्वीच जाहीरपणे औरंगाबादचे संभाजीनगर केले. हे नामांतर लोकांनी स्वीकारल्याचं शिवसेनेने म्हटलंय.

थोडक्यात बातम्या-

कंगणा राणावतच्या अडचणीत वाढ; कंगणाची ‘ती’ याचिका न्यायालयाने फेटाळली

संजय राऊत यांचे निकटवर्तीय असणाऱ्या प्रवीण राऊतांची इतक्या कोटींची संपत्ती जप्त!

“पुण्याकडे राज्याची तिजोरी आहे, त्यामुळे आता चिंता करायची गरज नाही”

भीमा-कोरेगावची जागा ताब्यात घेण्यासाठी न्यायालयीन लढा लढणार- नितीन राऊत

अभिनेता सोनू सूदचा कंगणाला अप्रत्यक्षपणे टोला; म्हणाला…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या