महाराष्ट्र मुंबई

“नितीशकुमार हे शरद पवारांसारखे, सहजासहजी कुणाच्या हाती लागणार नाहीत”

मुंबई | बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासारखे आहेत. ते सहजासहजी कुणाच्या हाताला लागणार नाहीत, असं मत शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे.

सरकार चालवत असताना नितीशकुमारांनी सरकार म्हणून घेतलेले काही निर्णय अंडरस्कॅनिंग असतील किंवा त्यांच्या काही फायली अंडरस्कॅनिंग असतील असं तुम्हाला वाटत असेल… पण नितीशकुमार हे काही प्रमाणात शरद पवारांसारखेच आहे, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

राज्य चालवताना काही निर्णय घ्यावे लागतात. त्यामुळे त्यात भ्रष्टाचारच झालाय असं म्हणणं योग्य ठरणार नाही. पण तरीही असं जर कुणाला काही वाटत असेल तर त्यांनी त्यांच्या राज्यकारभाराविषयी आत्मचिंतनच केलं पाहिजे, असं राऊत म्हणाले.

सध्याचं बिहारमधील एनडीएचं सरकार हे बहुमताच्या काठावरचं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीपासून सर्व केंद्रीय मंत्र्यांनी बिहारमध्ये प्रचार केला. पण त्यांना दोनचंच बहुमत मिळलं. त्यामुळे कितीही जुळवाजुळव केली तरी नव्या सरकारला टेकू मिळत नाही, तोपर्यंत सरकार टिकणार नाही, असं राऊत म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

“…राहुल गांधी शाळेतील वाईटातले वाईट विद्यार्थी, काँग्रेस नेते एकाच कुटुंबामागे कधीपर्यंत धावणार?”

“दानवे येऊन जाऊन बाप काढतात, दानवेंना विचारा त्यांचे बाप कोण आहे, कोणाचे बाप, किती बाप?”

 सोमय्यांना आरोप करण्याचे अधिकार, शिवसेनेनं ते खोडावेत- चंद्रकांत पाटील

 संन्यास घेण्याचं बोललोच नाही- नितीश कुमार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या