काँग्रेस खासदाराची कार संसदेत घुसली; जवानांनी रोखल्या बंदुका!

काँग्रेस खासदाराची कार संसदेत घुसली; जवानांनी रोखल्या बंदुका!

नवी दिल्ली | संसदेच्या अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस होता. मात्र आज घडलेल्या घटनेनं संसदेमध्ये सगळ्यांचीच तारांबळ उडाली होती.

सकाळी 12 च्या सुमारास एक कार संसदेच्या परिसरात येऊन कठड्यांना जाऊन धडकली. त्यामुळे सुरक्षा रक्षकांची चांगलीच धावपळ उडाली. सुरक्षा रक्षकांनी तात्काळ कारवर बंदुका रोखल्या.

सुरक्षा रक्षकांनी जेव्हा कारची तपासणी केली तेव्हा त्यात काँग्रेसचे मणिपूरचे खासदार डॉ. थोकचोम मेनिया बसले होते. चुकीनं त्यांची गाडी कठड्यावर आदळली होती.

दरम्यान, या प्रसंगामुळे काही काळ संसदेचं वातावरण गंभीर झालं होतं.

महत्वाच्या बातम्या-

उदयनराजेंच्या हमे तुमसे प्यार कितना…गाण्याला सातारकरांचा टाळ्या शिट्यांनी प्रतिसाद

संतापजनक! 7 वर्षाच्या चिमुरडीवर मुलाने केला बलात्कार अन बापाने केली हत्या

“शिवसेनेला एक हाक द्या, आम्ही तुमच्या मदतीला धावून येऊ”

-भाजप नेत्याच्या मुलाला जाब विचारला म्हणून केली शिवीगाळ!

सुरेश प्रभू ‘या’ मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार?

Google+ Linkedin