बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! एकनाथ शिंदेंचा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना फोन

मुंबई | एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाविकास आघाडी सरकार धोक्यात आलं आहे. काही दिवसांपुर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार  यांनी शिंदे यांच्या बंडामागे भाजप नेत्यांचा हात असल्याचं म्हंटलं होतं. भाजप नेत्यांनी मात्र त्यातून अंग काढून घेतलं. त्यानंतर शिंदे गटाने आम्हीच खरी शिवसेना असा दावा केला होता आणि आपल्या गटाचं नाव शिवसेना बाळासाहेब ठाकरे असं ठेवण्याचा प्रयत्न सुरु केला.

शिंदे गटाने शिवसेनेकडे महाविकास आघाडीतील घटक पक्षांना काडीमोड देऊन भाजपसोबत सत्ता स्थापन करावी अशी मागणी केली होती. पण शिवसेनेने ती फेटाळली. त्यानंतर त्यांनी सत्तास्थापनेसाठी संर्घष सुरु केला. आता एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना फोन केला आहे अशी माहिती मिळते. आता त्यांच्यात काय संभाषण झालं हे अद्याप कळलं नाही.

राज ठाकरे यांच्या पायावर नुकतीच एक शस्त्रक्रिया झाली आहे. त्यांना रुग्णालयातून सुट्टी मिळाली आहे. त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी त्यांनी ठाकरेंना फोन केल्याची माहिती दिली. शिंदे गट राज ठाकरे यांच्या पक्षात विलीन होणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. या सर्व घडामोडीवर राज ठाकरे यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटाला वेगळ्या पक्षात विलीन होण्याशिवाय पर्याय नाही, असं म्हटलं होतं. आता शिंदे गट भाजपमध्ये जाणार की मनसेमध्ये विलीन होणार हे आगामी काळ ठरवेल.

थोडक्यात बातम्या –

‘मरण आलं तरी बेहत्तर पण…’; एकनाथ शिंदे यांचं नवं ट्विट चर्चेत

‘जर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली तर…’; बंडखोर आमदाराचं वक्तव्य

“शिवसेना म्हटलं की मोदी, शहा पण घाबरून रस्ता बदलतात”

शिवसेनेच्या बंडखोर आमदाराच्या घर-कार्यालयावर हल्ल्याचा प्रयत्न; केंद्राने घेतला हा निर्णय

सामाजिक कार्यकर्त्या तीस्ता सीतलवाड यांना अटक, वाचा नेमकं काय आहे प्रकरण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More