व्हॉट्सअॅपवरुन आता १०० एमबीपर्यंतची कुठलीही फाईल पाठवा!

मुंबई | १०० एमबीपर्यंतची कोणत्याही प्रकारची फाईल आता व्हॉट्सअॅपवरुन पाठवता येणार आहे. व्हॉट्सअॅपच्या नव्या अपडेटमध्ये ही सुविधा देण्यात आली आहे. 

यापूर्वी दोन-चार प्रकारच्या १६ एमबी पर्यंत साईज असलेल्या फाईल व्हॉट्सअॅपवरुन पाठवता यायच्या. मात्र व्हॉट्सअॅपने आता यामध्ये बदल केला आहे. 

या सुविधेचा लाभ घेण्यासाठी व्हॉट्सअॅपच्या वापरकर्त्याला प्ले स्टोअरवरुन आपलं व्हॉट्सअॅप अपडेट करुन घ्यावं लागणार आहे. त्यानंतर संबंधिताला कुठलीही फाईल शेअर करता येऊ शकते.