Top News महाराष्ट्र मुंबई

ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘जिवेत् शरद: शतम् योजना’; नेमकी काय आहे ही योजना???

Photo Courtesy- Facebook/Sharad Pawar

मुंबई | महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी जिवेत् शरद: शतम् योजना प्रस्तावित असल्याचे जाहीर केले आहे. येत्या विधीमंडळ अधिवेशनात ही योजना जाहीर होण्याची चिन्हं आहेत. वयाची साठी ओलांडलेल्या लोकांसाठी सध्या कोणतीही योजना नसल्याने ही योजना उपयुक्त राहील.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष व खासदार शरद पवार यांनी नुकतीच वयाची 80 वर्षे पूर्ण केली आहेत. त्यांचे नाव ह्या योजनेला देण्यात आल्याची चर्चा असून प्रत्येक ज्येष्ठ नागरिक शतायुषी व्हावा हा या मागचा हेतू आहे.

ज्येष्ठ नागरिक बहुतांशवेळा आपल्या तब्येतीची विशेष काळजी घेत नाहीत किंवा आर्थिक परिस्थितीमुळे ते शक्य होत नाही. परिणामी योग्यवेळी आजार न कळल्यामुळे त्याचा शरीरावर वाईट परिणाम होतो. काही आजार हे वेळीच लक्षात आल्यास त्यांचे निदान करणे सोपे असते व संभाव्य धोकाही टाळता येऊ शकतो.

या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना मोफत आरोग्य तपासणी करता येणार आहे. कोरोनानंतर ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ज्येष्ठ नागरिकांना त्याचा सर्वाधिक धोका असताना ही योजना त्यांच्यासाठी वरदानच ठरणार आहे. ज्या नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार नाही, त्यांच्यासाठी अनुदान देण्याचीही तरतूद यामध्ये करण्यात आल्याची माहिती आहे.

थोडक्यात बातम्या-

पंढरपुरात काय वाजतं गाजतं, सोन्याचं बाशिंग… लगीन देवाचं लागतं… पाहा व्हिडीओ

टूलकिट प्रकरणाचे महाराष्ट्र कनेक्शन; बीडमधला संशयित फरार!

भारतीयांना जगातील सर्वात मोठ्या स्टेडिअमवर दिवस-रात्र क्रिकेट सामना पाहण्याची संधी

सावधान!!! कोरोनाचा धोका वाढतोय, आता महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यातही संचारबंदी!

सुशांतसिंहसोबत काम केलेल्या अभिनेत्याची आत्महत्या; फेसबुकवर शेअर केला व्हिडीओ

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या