बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोना लसींच्या किमती कमी करण्याचे सिरम आणि भारत बायोटेकला निर्देश

नवी दिल्ली | भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. त्यातच कोरोना लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात आली आहे. भारत बायोटेक आणि सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या दोन कंपन्यांची लस सध्या नागरिकांना दिली जात आहे. या कंपन्यांनी 1 मे 2021 पासून ही लस भारतीय बाजारात येणार असल्याचे घोषित केले तसेच या लसींच्या किमतीही जाहीर केल्या.

सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची कोविशिल्ड ही लस केंद्र सरकारला 150 रुपयांना, राज्य सरकारला 400 रुपयांना तर इतर खाजगी रुग्णालयांना 600 रुपयांना देण्याचं कंपनीतर्फे स्पष्ट करण्यात आलं आहे. तसेच भारत बायोटेकची कोवॅक्सिन ही लस राज्य सरकारला 600 रुपयांना तर खाजगी रुग्णालयांना 1200  रुपयांना दिली जाणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं.

दरम्यान, या लसींच्या किमतीवरून राज्य सरकारने केंद्र सरकारला किमती कमी करण्यासंदर्भात विनंती केली होती. तसेच यावरून अनेक राजकीय टीकाटिप्पणीलाही मोठ्या प्रमाणात उधाण आल्याचं पाहायला मिळालं. मात्र, आता केंद्र सरकारने यामध्ये हस्तक्षेप करत भारत बायोटेक आणि सिरम इन्स्टिट्यूट यांच्याशी चर्चा करून कोरोना लसीच्या किंमती करण्याबाबत विचारणा केली आहे.

महाराष्ट्रात सोमवारी देशपातळीवर लसीकरणाचा नवा विक्रम नोंदवला गेला आहे. तब्बल पाच लाखांहून अधिक नागरिकांना एका दिवसात लस देण्यात आल्याने महाराष्ट्र राज्य लसीकरणात अग्रेसर असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे.

थोडक्यात बातम्या –

फक्त याच ठिकाणी 14 दिवसांचा कडक लाॅकडाऊन; केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सुचना जाहीर

महाराष्ट्रातील लाॅकडाऊन वाढणार का?; टास्क फोर्सच्या सदस्यांचं मोठं वक्तव्य

नगरसेविकेच्या मुलाला पुणे पोलिसांकडून अटक, कारण अत्यंत धक्कादायक

महाराष्ट्राने नोंदवला एका दिवसातील कोरोना लसीकरणाचा नवा विक्रम

विश्वासाचं दुसरं नाव टाटा… देशवासियांना दिलेला शब्द चौथ्याच दिवशी पूर्ण केला!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More