Top News पुणे महाराष्ट्र

महाविकास आघाडीत वादाचा नवा मुद्दा; शिवसेना नेत्यानं शरद पवारांच्या विरोधात दंड थोपटले!

पुणे | शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांनी भाजपला सत्तेपासून दूर ठेवलं खऱं, मात्र या तीन पक्षांमधील कुरबुरी काही कमी होण्याचं नाव घेत नाहीयेत. आता पुरंदर विमानतळाच्या मुद्द्यावरुन शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी थेट शरद पवार यांच्याविरुद्ध दंड थोपटले आहेत.

औरंगाबाद नामांतराच्या मुद्द्यावरुन काँग्रेस आणि शिवसेनेत नुकताच कलगीतुरा रंगल्याचं संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलं. त्यानंतर आता पुरंदरच्या मुद्द्यावरुन शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पुरंदरचे प्रस्तावित विमानतळ बारामतीला पळवण्याचा शरद पवार यांचा डाव असल्याचा खळबळजनक आरोप माजी मंत्री विजय शिवतारे यांनी केला आहे. विमानतळाचे प्रवेशद्वार बारामतीला नेऊन पुरंदरमध्ये झोपडपट्टी वाढवण्याचा घाट घातला आहे, मात्र तो आम्ही हाणून पाडू, असं शिवतारे यांनी म्हटलंय.

दरम्यान, शिवतारे आणि पवार कुटुंबातील वैर काही नवीन नाही. याआधी अजित पवार यांनी शिवतारेंना थेट चॅलेंज करुन विधानसभेत पराभवाचं तोंड पहायला लावलं होतं. आता हा नवा वाद फक्त पवार-शिवतारे यांच्यापुरता मर्यादित राहील की शिवसेना यात उडी घेईल हे लवकरच पहायला मिळेल.

थोडक्यात बातम्या-

“पुरंदरमधील विमानतळ बारामतीला पळवण्याचा शरद पवारांचा डाव”

“शेतकरी कायद्यांना विरोध करणाऱ्यांनो… हा दुटप्पीपणा किळसवाणा आहे”

पोलिसांसाठी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा

राहुल गांधींनी शिवसेनेला जागा दाखवली- अतुल भातखळकर

लेकीला शिकवा, तिच्या पंखांना बळ द्या- अमृता फडणवीस

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या