Top News विधानसभा निवडणूक 2019

मुख्यमंत्री ठरवण्यात शरद पवारांची भूमिका महत्त्वाची असणार- शिवसेना

मुंबई | यावेळी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होईल हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ठरवणार आहेत. यात राज्याचे मोठे नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे, असं सूचक वक्तव्य आजच्या सामना अग्रलेखातून शिवसेनेनं केलं आहे.

शरद पवार आणि राज्यातील काँग्रेसच्या अनेक आमदारांनी हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. महाराष्ट्राचा निर्णय महाराष्ट्रावर सोपवा असे त्यांनी सोनियांना सांगितले. काही झाले तरी भाजपचा मुख्यमंत्री नको असा एकमुखी सुर महाराष्ट्राचा आहे, असंही अग्रलेखात म्हणण्यात आले आहे.

सूडाचे, पाय खेचण्याचे आणि गुलामीचे राजकारण सर्वांना संपवायचे आहे. पाच वर्ष इतरांना भीती दाखवून राज्य करणारी मंडळी आता स्वत्त:च दहशतीखाली आहे, असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

दरम्यान,  राष्ट्रवादीचे सर्व आमदार आणि खासदार यांच्याशी शरद पवार 12 तारखेला सत्तास्थापनेच्या तिढ्यावर चर्चा करणार आहेत. शिवसेनेला पाठिंबा देण्यासंदर्भात या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती कळतीये. त्यामुळे सामनातील भूमिकेला महत्त्व प्राप्त झालं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या