बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“त्याच्या मुलाच्या अटकेवर थोडीतरी सहानुभूती दाखवा”

मुंबई | अमली पदार्थ विरोधी पथकाने कार्डेलिया क्रुझवर कारवाई केली. यात शाहरूख खानच्या मुलाला एनसीबीनं ताब्यात घेतलं. आर्यन खानला अटक होताच वेगवेगळ्या स्तरांवरून प्रतिक्रिया उमटायला सुरूवात झाली. कोणाचाही मुलगा असो कठोर कारवाई ही झालीच पाहिजे अशी मागणी बऱ्याच लोकांकडून करण्यात येत आहे.

कारवाईची मागणी करणाऱ्यांसोबतच आर्यन खानच्या बचावासाठी उतरलेली मंडळीही बरीच आहे. शाहरूख खानला पाठींबा दर्शवणाऱ्या लोकांच्या यादीत आता काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्या नावाची भर पडली आहे. शाहरूखच्या मुलाच्या अटकेवर थोडीतरी सहानुभूती दाखवा, म्हणत त्यांनी नेटकऱ्यांना सुनावलं आहे.

“मी अमली पदार्थांचा चाहता नाही आणि त्याचं सेवन करण्याचाही मी कधी प्रयत्न केला नाही. पण ज्या पद्धतीने लोक शाहरूखच्या मुलाच्या अटकेवरून खिल्ली उडवत आहेत ते बघून मलाच वाईट वाटलं. थोडीतरी सहानुभूती बाळगा. यात 23 वर्षीय मुलाचा चेहरा आनंदाने दाखवायची गरज नाही,” या आशयाचं ट्वीट शशी थरूर यांनी केलं आहे.

आर्यन खानला अटक होताच शाहरूख खानवरही बरीच टीका करण्यात आली. आर्यनच्या अटकेच्या व्हिडीओसह बरेच मीमही सोशल मीडियावर व्हायरल झाले. आर्यन खानसह अरबाज मर्चंट, मुनमुन धमेचा अशा 8 जणांना एनसीबीनं अटक केली असून त्यांना 7 ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी सुनावण्यात आली आहे.

 

 

 

थोडक्यात बातम्या-

लखीमपूरच्या ‘त्या’ घटनेचा व्हिडीओ आला समोर; संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद

परतीच्या पावसामुळे ‘या’ जिल्ह्यांना हायअलर्ट; पुढचे 4 दिवस धोक्याचे

हाॅर्नची कटकट संपणार, नितीन गडकरींनी आणली ‘ही’ नवी योजना

”फक्त भाजप आमदारांच्या मतदारसंघातच लाॅकडाऊन लावलं जातं”

“शाहरूखच्या पुत्राच्या कृत्याचे ढोल बडवताना मीडिया मात्र…” राऊतांचा मीडियावर हल्लाबोल

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More