बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शिबानी दांडेकरने रिया चक्रवर्तीबाबत केला ‘हा’ मोठा खुलासा

मुंबई । बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्ती अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या वादात अडकली होती. सोशल मीडियावर सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरून रियाला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं होतं. रियाला सुशांतच्या मृत्युप्रकरणावरून सीबीआय, ईडी, एनसीबी यांसारख्या देशाच्या प्रमुख केंद्रीय यंत्रणा तपास करत होत्या. त्यावेळी रियाच्या समर्थनार्थ अनेकजण उभे राहिले होते.

यामध्ये बॉलिवूडच्या अभिनेत्रींचा देखील समावेश होता. अशातच प्रसिद्ध अभिनेत्री आणि टेलिव्हिजन होस्ट शिबानी दांडेकरने याबाबत नवा खुलासा केला आहे. एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत तिने रियाला त्यावेळी का पाठिंबा दिला?, याबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे.

अभिनेत्री आणि टेलिव्हिजन होस्ट शिबानी दांडेकर ही रिया चक्रवर्तीची जवळची मैत्रीण मानली जाते. तिने रियाला पाठिंबा दिल्यानंतर तिच्या अनेक सोशल मीडियावरील फॉलोअर्सना गमावावं लागलं. इतकचं नाही तर तिला सोशल मीडियावर देखील ट्रोल करण्यात आलं होतं. यावर तिने आता मौन सो़डलं आहे.

दरम्यान एका मुलाखतीत तिने अशी प्रतिक्रिया दिली आहे की, सुशांतच्या कुंटुंबियांना सुशांतची कथित गर्लफ्रेंड अर्थात रिया चक्रवर्ती ही आवडत नव्हती. सुशांतच्या बहिणीचंसुद्धा रियासोबत काही पटत नव्हतं. ही गोष्ट रियाने सुशांतला पण सांगितलेली होती. कुंटुंबियांशी पटलं नाही तर रियानेच आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केलं?, असाच अर्थ होतो का?, असा सवाल शिबानीने केला आहे.

थोडक्यात बातम्या-

माझ्यावर दिवसाला 100 गुन्हे दाखल करा, मी बोलत राहणार- चित्रा वाघ

“जोपर्यंत कोरोना कमी होणार नाही तोपर्यंत साहित्य संमेलन नाही”

भारताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा! 11 वर्षांची नताशा ठरली जगातील सर्वात हुशार विद्यार्थिनी

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय! पूरग्रस्तांसाठी 11 हजार 500 कोटींच्या पॅकेजला मंजुरी

… अन्यथा आंदोलन करण्यात येईल, एमपीएससीचे विद्यार्थी पुन्हा आक्रमक!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More