Top News कोल्हापूर क्राईम महाराष्ट्र

एकाच गावातील तरुण-तरुणीच्या आत्महत्येनं खळबळ; पाहा काय आहे प्रकरण

photo credit- Pixabay

कोल्हापूर | राज्यात दिवसेंदिवस आत्महत्येचं प्रमाण वाढतं चाललं आहे. अशात कोल्हापूर जिल्ह्यातील एका गावातील तरुण-तरुणीने एकाच दिवशी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळं परिसरात खळबळ उडाली आहे.

16 फेब्रुवारी रोजी कोल्हापूर जवळील चुये गावातील तरुण-तरुणीने एकाच दिवशी आत्महत्या केली आहे. मृत तरुणाचं नाव अनिकेत पाटील असून त्याने आपल्या राहत्या घरी दुपारी दोन वाजताच्या सुमारास आत्महत्या केल्याचं समजतंय. तर मृत तरुणी सानिका व्हनाळकरने तिच्या पाचगाव येथील नातेवाईकांच्या घरी आत्महत्या केली आहे.

प्रेमाला विरोध झाल्यानं या दोघांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याची चर्चा गावात आहे. मात्र तरुणीने लिहिलेल्या चिठ्ठीत लग्नासाठी कर्ज व्हायला नको

मृत अनिकेत पाटील हा बीएससीचं शिक्षण घेत होता. त्याने तर सानिकाचा विवाह ठरला होता. त्यामुळे ती पाचगाव परिसरात राहणाऱ्या आपल्या नातेवाईकांकडे राहण्यासाठी गेली होती. इथेच तिनेही विषारी औषध प्राशन केले.

थोडक्यात बातम्या-

पुढील दोन दिवसांत ‘या’ भागात पावसाची शक्यता; हवामान खात्याचा अंदाज

तयार राहा, माझं आणखी एक गाणं येतंय- अमृता फडणवीस

दहावी-बारावीच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर, राहिले फक्त एवढे दिवस!

200 जणांविरुद्ध गुन्हा दाखल, धरपकड सुरु; पुण्यातील या कारवाईनं गुंडांचे धाबे दणाणले!

नवीन कृषी कायदे लहान शेतकऱ्यांच्याच फायद्याचे- नरेंद्र मोदी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या