बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…म्हणून पठ्ठ्यानं टी-शर्टवरवरच छापलं वॅक्सिनेशन सर्टिफिकेट, पाहा फोटो!

मुंबई | सध्या देशभरात लसीकरण वेगानं सुरु आहे. तिसरी लाट रोखण्यासाठी लसीकरणाला गती देण्याची गरज तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. नागरिक आता स्वतःहून समोर येत लसीकरण घेत असलेले पाहायला मिळतात. लसीचे दोन्ही डोस घेणं गरजेचं आहे. कोरोना लसीकरण झाल्यावर एक सर्टीफिकेट भेटतं. एका पठ्ठ्यानं चक्क हे सर्टिफीकेट आपल्या टी-शर्टवर छापलं आहे.

व्हायरल होणारा फोटो अतुल खत्री यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. फोटो शेअर करताना त्यांनी पुन्हा सगळी कामं, विमान, लोकल प्रवास सुरू झाला आहे. सारखं-सारखं वॅक्सिनेशन सर्टिफिकेट दाखवून कंटाळा आला असल्यानं टी-शर्टवरवरच छापून घेतलं व्हॅक्सिनेशन सर्टिफिकेट, असं कॅप्शनही अतुल खत्री यांनी दिलं आहे.

सध्या सोशल मीडियावर लसीकरण झाल्यावर फोटो शेअर करण्याचं आणि सर्टिफिकेटचा फोटो टाकण्याचा एक क्रेझच झाला आहे. त्यामुळे सोशल मीडिया उघडल्यावर तुम्हाला या स्टोरीज तुम्हाला हमखास पाहायला मिळतील. अशातच सध्या टी-शर्टवर लसीकरणाचा फोटो छापलेला पाहून अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत.

दरम्यान, कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरण महत्वाचं शस्त्र असून लसींचा पुरवठा सुरळीत राहिल्यास राज्यात अशाच मोठ्या संख्येने नागरिकांचे लसीकरण होऊ शकते. 

थोडक्यात बातम्या –

लसीचे दोन्ही डोस घेऊन देखील ‘इतक्या’ रुग्णांना डेल्टा प्लसची लागण!

‘…याला म्हणतात ओळख’; लस घेण्यासाठी अनोखा जुगाड, पाहा व्हिडीओ

स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी मंत्रालयासमोर शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न!

भररस्त्यात दोन महिलांमध्ये हाणामारी; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

आमचं ठरलंय, 2024 ला एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही- संजय राऊत

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More