बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

प्रेम आंधळ असतं! प्रियकरावर विश्वास ठेवत प्रेयसीने मारली उलटी उडी अन्…; पाहा व्हिडीओ

 मुंबई | सोशल मीडियावर आजकल अनेक कपल जीवघेणी स्टंट करून व्हिडीओ अपलोड करताना दिसतात. कमी वेळात प्रसिद्धी मिळवण्यासाठी तरूण जीवाचा विचार न करता असे प्रकार करत असतात. तशा प्रकारचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर आहेत. अशातच एक जीवघेणा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

व्हिडीओमध्ये एक तरूणी झाडावर उभी राहिली आहे. तिच्यासोबत असलेला तिचा प्रियकर तिला झेलण्यासाठी झाडाखाली उभा आहे. नंतर ती तरूणी झाडावरून स्वत:ला खाली झोकून देते. झाडाखाली उभा असलेला प्रियकर तिला दोन्ही हातात झेलतो. तरूणी इतक्या उंचावरून पडल्याने त्या तरूणाचाही समतोल थोडासा बिघडतो. परंतु त्या तरूणीला काहीच होत नाही. तेव्हा हे सगळं बघून आपल्याही काळजाचा ठोका चुकतोय.

इतका मोठा स्टंट करून देखील त्या तरूणाच्या चेहऱ्यावर भीती दिसत नाही. मात्र घडलेल्या प्रकाराबाबत तरूणी व्हिडीओमध्ये थोडी घाबरलेली दिसते. परंतु काही वेळाने जिंकल्यासारखा आनंद चेहऱ्यावर त्यांच्या दिसुन येतं.

दरम्यान, हा व्हिडीओ इंस्ट्राग्रामवर अपलोड करण्यात आला आहे. यावर अनेकांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. तर काही जणांनी त्या तरूणाचं कौतुक केलं आहे तर काहींनी हा फक्त वेडेपणा असल्याचं म्हटलं आहे.

 

 

थोडक्यात बातम्या-

“राणेंना केलेली अटक योग्यच पण…”; पाहा न्यायालयानं दिलेल्या निकालात काय म्हटलंय!

“माजी मुख्यमंत्री सुज्ञान आहेत, मात्र…”; नाशिक पोलीस आयुक्तांचं देवेंद्र फडणवीसांना सडेतोड उत्तर

नारायण राणेंच्या पत्रकार परिषदेतील 10 महत्त्वाचे मुद्दे!

“पोलिसांनी मला अटक केली नव्हती, मी स्वत: कोर्टात गेलो होतो”

पवार साहेब याला मुख्यमंत्री केला, याचा सुसंस्कृतपणा बघा- नारायण राणे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More