मुंबई | सुष्मिता सेन सोशल मीडीयावर नेहमीच सक्रिय असते. गेल्या आठवड्यात ती ललित मोदींनी केलेल्या डेटींगच्या पोस्टमुळे चर्चेत होती. सुष्मिता नेहमीच सोशल मीडियावर फोटो टाकत असते. तीने नुकताच एक सेल्फी इंस्टाग्रामवर आणि ट्वीटरवर शेअर केला आहे. त्या फोटोत गॉगलमध्ये दिसणाऱ्या गोष्टींमुळे नेटकरी सुष्मिताला ट्रोल करत आहेत.
शेअर केलेल्या फोटोत ती एका कारमध्ये बसलेली आहे. त्यात तिने ब्लू कलरचा टॉप आणि गॉगल परिधान केला आहे. सुष्मिताच्या या गॉगलमध्ये दोन बोटल दिसत आहेत. त्यामुळे प्रेक्षक तिला कमेंट करत ट्रोल करत आहेत. एका नेटकऱ्याने वोडका आहे का?, अशी कमेंट केली तर दुसऱ्याने शॅम्पियनच्या दोन बॉटल्स आहेत का?, अशी कमेंट केली होती. त्यामुळे सुष्मिता सेन सोशल मिडीयावर चांगलीच ट्रोल होत आहे.
काही दिवसांपूर्वी तीने ललित मोदींनी केलेल्या डेटींगच्या पोस्टला रंगलेल्या चर्चांना उत्तर दिलं ती म्हणाली, सध्या मी आंनदी आहे. मी लग्न केलं नाही आणि साखरपुडाही केला नाही. सध्या मी प्रेमळ माणसांच्या सानिध्यात आहे.
हे माझं स्पष्टीकरण आता तुम्ही तुमचं आयुष्य जगा आणि काम करा. ज्यांनी माझा आनंद शेअर केला त्यांना धन्यवाद. आणि ज्यांनी शेअर केला नाही त्यांना ‘None of Your Business’ असं लिहीत तिने यापूर्वी पोस्ट केली होती.
थोडक्यात बातम्या –
“शिंदेंना मुख्यमंत्रीपद देताना दगड डोक्यावर ठेवला की छातीवर?”
मोठी बातमी! जयंत पाटलांना इस्लामपूर न्यायालयाचं वॉरंट
शिंदेंच्या बंडाबाबत उद्धव ठाकरेंच्या जवळच्या सहकाऱ्याने केला मोठा गौप्यस्फोट!
“आम्ही मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलंय”
…तर शुगर राहिल कंट्रोलमध्ये; डायबिटीस पेशंटसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी
Comments are closed.