सोलापूर | रत्नागिरी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटलं होतं. हे धरण खेकड्यांनी भगदाड पाडल्यामुळे फुटलं, असं ग्रामस्थ आणि अधिकाऱ्यांचं मत असल्याचा दावा जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी केला आहे.
चिपळूणचे शिवसेना आमदार सदानंद चव्हाण हे झालेल्या घटनेला जबाबदार नाहीत, अशा शब्दात त्यांनी चव्हाणांची पाठराखण केली आहे. या दुर्घटनेत अनेक लोकांचा मृत्यू झाला होता तर 24 जण बेपत्ता देखील झाले होते.
पुण्यात खडकवासला धरणाचा कालवा फुटून झालेल्या दुर्घटनेचं खापर त्यावेळीही उंदीर आणि खेकड्यांवरच फोडण्यात आलं होतं. याच प्रकरणाची पुनरावृत्ती होताना दिसून येत आहे.
दरम्यान, खेकड्यांनी भिंत पोखरल्याची थिअरी शिवसेना आमदाराला वाचविण्यासाठी नाही. मला जे ग्रामस्तांनी सांगितले तेच मी सांगतोय, असंही सांगायला तानाजी सावंत विसरले नाहीत.
महत्वाच्या बातम्या-
-“आम्ही प्रकाश आंबेडकरांसोबत आघाडी करायला तयार आहोत पण…”
-विराट शब्दाला जागला; ‘त्या’ आजीसाठी केली ही खास गोष्ट
-भारत देश 2022 मध्ये कुपोषणमुक्त होईल- स्मृती इराणी
-राज ठाकरे आमच्या सोबत यावेत… ही माझी मनापासून इच्छा- राजू शेट्टी
-‘या’ बाॅलीवूड अभिनेत्रीचं ब्रेकअप; 5 वर्षांपासून करत होते एकमेकांना डेट
Comments are closed.