Top News तंत्रज्ञान देश

ना पगारकपात, ना नोकरकपात; उलट ‘ही’ कंपनी 40 हजार लोकांना देणार रोजगार!

मुंबई | सध्या कोरोनाच्या काळात हातातील आहे ते काम जातं काय? अशी कामगारांची अवस्था झाली आहे. उद्योगधंदे सुद्धा तोट्यात सुरु आहे, अशा परिस्थितीत आयटी क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या टीसीएस अर्थात टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसनं तब्बल ४० हजार जणांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे.

कॅम्पस इंटरव्ह्यूच्या माध्यमातून टीसीएस ही भरती करणार आहे. विशेष बाब म्हणजे भारतासोबतच कंपनी अमेरिकेमध्ये देखील रोजगार देणार आहे. अमेरिकेत २ हजार लोकांना काम देण्याची कंपनीची योजना आहे.

कोरोनाच्या संकटामुळे या वर्षीच्या पहिल्या सहामाहीत कंपनीला तोटा सहन करावा लागला आहे. तरी देखील कंपनीने ४० हजार जणांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी काळात सर्वकाही सुरळीत होऊन हा तोटा भरुन निघेल, असा आशावाद टीसीएसला आहे.

कंपनीच्या निर्णयाबद्दल माहिती देताना टीसीएसचे इव्हीपी आणि ग्लोबल एचआर हेड मिलिंद लक्कड यांनी सांगितले की, नव्याने सुरुवात करण्याच्या आमच्या धोरणात कोणताही बदल झालेला नाही. भारतात आम्ही ४० हजार रोजगार देणार आहोत. ही संख्या ३५ हजार ते ४५ हजाराच्या दरम्यान असू शकते. हा एक टेक्टिकल कॉल असेल.

महत्वाच्या बातम्या-

भाजपला घोडेबाजाराची सवय आणि पैशाचा उन्मात आहे- यशोमती ठाकूर

बारावीच्या निकालात ‘या’ मुलीने मिळवलेले गुण वाचून तुम्हीही आश्चर्यचकीत व्हाल!

‘येत्या दोन महिन्यात परीक्षा घेणं अशक्य’; परीक्षा न घेण्याच्या निर्णयावर राज्य सरकार ठाम

“RSS ने धारावी कोरोनामुक्त केली असेल, तर नागपुरात संघाचं मुख्यालय, तिथे कोरोनाचा कहर कसा?”

‘गुगल भारतात इतक्या हजार कोटींची गुंतवणूक करणार’; सुंदर पिचई यांनी केली मोठी घोषणा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या