बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नवऱ्याने आपल्या दुसऱ्या पत्नीची तलवारीने गळा चिरून केली हत्या

जयपूर | राजस्थानच्या जोधपूर शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तिनं आपल्या पत्नीची तलवारीनं गळा चिरून हत्या केली आहे. महत्वाचं म्हणजे आरोपी हत्या करून स्वत: पोलीस ठाण्यात गेला आणि आपला गुन्हा कबूल केला. संबधित आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे.

रविवारी रात्री उशिरा घटना घडली आहे. जोधपूरच्या पीपरली गावात ही घटना घडली. आरोपी पती आणि त्याच्या पत्नीमध्ये कडाक्याचं भांडण झालं होतं. या भांडणात ते एकमेकांवर तुटून पडले आणि भांडण टोकाला गेलं. त्यातच पतीने रागात पत्नीवर तलवारीने हल्ला केला आणि त्यातच पत्नीचा गळा चिरून हत्या केली. घटनेनंतर आरोपी पती पोलीस ठाण्यात गेला आणि स्वत:ला पोलिसांच्या स्वाधीन केलं.

पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच ते तातडीनं घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला. तो मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. मृतक महिला ही आरोपीची दुसरी पत्नी होती. त्याला पहिल्या पत्नीपासून एक मुलगा देखील आहे. आरोपीचं दुसऱ्या पत्नीसोबतही जमत नव्हतं. त्याला पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. यावरुन त्यांच्यात वाद सुरु होता. याच विषयावरुन दोघांमध्ये रविवारी रात्री कडाक्याचं भांडण झालं. त्यात त्याने पत्नीची हत्या केली, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

दरम्यान, पोलिसांना घटनास्थळी आरोपीची तलवार मिळाली आहे. तलवार रक्तानं भरलेली आढळून आली होती. पोलिसांनी ती तलवार जप्त केली आहे. तर, आरोपीलाही बेड्या ठोकल्या आहेत. संबधित प्रकरणी पुढील तपास पोलिसांकडून सुरु आहे.

थोडक्यात बातम्या

“सामनाचा अग्रलेख म्हणजे ‘खाली डोकं वर पाय’”

‘आदित्य ठाकरे यांचा ढोंगी चेहराही आता उघड झाला’; भाजपच्या ‘या’ आमदाराची जहरी टीका

“जनता हेच सर्वात मोठं न्यायालय,आता ठोक मोर्चाचा न्यायपालिकेवर विश्वास राहिला नाही”

धक्कादायक! शिक्षक महिलेने डाॅक्टर पतीला दिल्या झोपेच्या गोळा, नंतर दिला शाॅक अन्…

पत्नीला आपल्या छोट्या भावासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिलं अन् पुढे झालं असं काही की…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More