सांगली | एखादा न बोलणारा व्यक्ती जेव्हा अचानक बोलायला लागतो तेव्हा आपण सगळेच अचंबित होतो. तसेच आतपर्यंत एकही गुन्हा नसल्यास जेव्हा एखाद्या राजकीय नेत्यावर जेव्हा गुन्हा नोंद होतो तेव्हाही आपल्याला असंच वाटत असतं. एखाद्या राजकीय नेत्यावर एखादा गुन्हा नोंद नसणं हे कधीतरीच घडतं. तसंच काहिसं राजकारणात सध्या घडलंं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना सांगलीच्या कोर्टातून वाॅरंट आलं आहे. हे त्यांच्यासोबत पहिल्यांदाच घडलं आहे. 5 वर्षापूर्वी जमावबंदीच्या आदेशाचं उल्लघंन केल्याने त्यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. वारंवार समन्स देऊनही कोर्टात हजर न राहिल्याने अखेर वाॅरंट काढण्यात आलं आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीवेळी आमदार जंयत पाटील यांच्यासह स्वरुपराव पाटील,मधुकर पाटील. रणजित पाटील, शदह गायकवाड, मोहन गायकवाड राजेंद्र भासर विलासराव शिंदे, जिंतेंद्र पाटील यांनी शिगाव येथे रस्त्यावरच ठिय्या मांडला होता. जमावबंदीच्या आदेशाचं उल्लघंन केल्याने सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
वाॅरट जाहीर केल्यानंतर त्यांनी न्यायालयात हजर राहत त्यांनी जामीन मंजूर करून स्वाताची सुटका करुन घेतली आहे. त्यांच्यावर असा गुन्हा दाखल होण्याची ही पहिलीच वेळ आहे
थो़डक्यात बातम्या
“न्यूड फोटो शेअर करण्याचं स्वातंत्र, मग हिजाब परिधान करण्याचं का नाही?”
“ऊस उत्पादकांमुळे शरद पवारांच्या पुतण्या आणि नातवांचे कारखाने निघाले”
संधी सोडू नका! iPhone 13 वर मिळतोय आतापर्यंतचा सर्वात मोठा डिस्काउंट
शिंदे सरकारचा महाविकास आघाडीला आणखी एक झटका!
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकारकडून मिळणार मोठं गिफ्ट
Comments are closed.